'त्या' तक्रारदार पोलीस निरिक्षकाची उचलबांगडी

By Admin | Updated: September 21, 2015 00:08 IST2015-09-21T00:08:25+5:302015-09-21T00:08:25+5:30

अमरावती मुख्यालयात हलविले असल्याची पोलीस महानिरिक्षकांनी दिली माहिती.

The 'Police Officer' of the 'complainant' | 'त्या' तक्रारदार पोलीस निरिक्षकाची उचलबांगडी

'त्या' तक्रारदार पोलीस निरिक्षकाची उचलबांगडी

वाशिम : ठोस पुरावे सादर न करता वाशिम पोलिस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून पोलीस निरिक्षक अशोक धोरबांड यांची वाशिम येथून अमरावतीला उचलबांगडी करण्यात आली, अशी माहिती पोलिस महानिरिक्षक संजीवकुमार सिंघल यांनी ह्यलोकमतह्णला रविवारला दिली. वाशिम पोलिस दलातील अधिकारी व काही कर्मचार्‍यांच्या विरूध्द पोलीस निरिक्षक धोरबांड यांनी अमरावती येथील पोलीस महानिरिक्षक सिंघल यांचेकडे लेखी तक्रार केली होती. हा विषय पूर्णत: गोपनीय ठेवणे हे पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांच्या शिस्तीचा महत्वाचा भाग आहे. परंतू, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या तक्रारीची माहिती धोरबांड यांनी प्रसारमाध्यमांना दिल्याने त्यांनी शिस्तभंग केला. अशी माहिती पोलिस महानिरिक्षक सिंघल यांनी १८ सप्टेंबर रोजी ह्यलोकमतह्ण दिली होती. याशिवाय त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन पोलिस निरिक्षक धोरबांड यांची १९ सप्टेंबर रोजी उचलबांगडी करून त्यांना अमरावती येथे हलविण्यात आल्याची माहिती सिंघल यांनी दिली. याशिवाय धोरबांड यांना तक्रारीमध्ये नमुद केलेल्या घटनेसंदर्भात पुरावे सादर करून खुलासा सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: The 'Police Officer' of the 'complainant'