परदेश शिष्यवृत्ती अर्ज आज शेवटची तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST2021-09-03T04:44:01+5:302021-09-03T04:44:01+5:30

रस्त्याचे कामे गतीने करण्याची मागणी वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व काही रस्त्यांच्या नूतनीकरणास सुरूवात झालेली आहे. यामुळे ...

Overseas scholarship application deadline today | परदेश शिष्यवृत्ती अर्ज आज शेवटची तारीख

परदेश शिष्यवृत्ती अर्ज आज शेवटची तारीख

रस्त्याचे कामे गतीने करण्याची मागणी

वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व काही रस्त्यांच्या नूतनीकरणास सुरूवात झालेली आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून संबंधित यंत्रणेने शहरातील रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

नाल्यावरील पुलाची दुरवस्था

वाशिम : सुपखेला नजीकच्या नाल्यास पावसाळ्यात आलेल्या पुराने या नाल्यावरील पूल खरडून गेला. यामुळे खड्डे पडले असून, येथे अपघाताची भीती आहे. पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

रिक्त पदे भरण्याची मागणी

वाशिम : लघुसिंचन विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे धरणांच्या देखभाल, दुरूस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष पुरवून रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

वाहतूक ठप्प, वाहनचालक त्रस्त

वाशिम : शहरातील सिंधी काॅलनी ते अकाेला नाका रस्त्याचे काम संथगतीने सुरु असल्याने वाहतूक ठप्प हाेत आहे.

Web Title: Overseas scholarship application deadline today