शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वृद्धेचा मृत्यू

By admin | Updated: December 12, 2014 00:37 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार; कायदेशीर कारवाईची मागणी

किनखेडा (वाशिम ) : रिसोड मालेगाव या प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डय़ाने अखेर शेलगाव राजगुरे येथील एका वृद्धेचा बळी ७ डिसेंबर रोजी घेतला. खड्डय़ांमुळे वृद्धेचा मृत्यू झाला. ९ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली अन् खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. केशवनगर ते किनखेडा मार्ग अतिशय खराब झाला असून, याबाबत संबंधित गावकर्‍यांनी सा.बां. विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या; मात्र रस्ता दुरुस्ती झाली नाही. मे २0१४ मध्ये किनखेडा ग्रा.पं.ने प्रवाश्याच्या सुखमय प्रवासासाठी खड्डय़ांमध्ये होमहवनाचा कार्यक्रमही केला. या आंदोलनाचे फलित झाले व रस्ता कामाची दुरूस्ती करण्यात आली. दुरूस्ती थातुरमातुर केल्याने पुन्हा मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले व या खड्डय़ांमुळे शेलगाव राजगुरे येथील बायडाबाई अंबादास वाघ ही महिला मृत्यू पावली. यासंदर्भात भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनंत देशमुख यांनी या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.