ग्राम स्वच्छता अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:42 IST2021-04-22T04:42:25+5:302021-04-22T04:42:25+5:30

या कार्यक्रमात सर्वप्रथम प्रभू श्रीराम व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून अर्पण नवनिर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे, ...

Launch of Village Sanitation Campaign | ग्राम स्वच्छता अभियानास प्रारंभ

ग्राम स्वच्छता अभियानास प्रारंभ

या कार्यक्रमात सर्वप्रथम प्रभू श्रीराम व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून अर्पण नवनिर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे, कारंजा पंचायत समितीच्या सभापती रविनाताई रोकडे तथा ग्राम किन्ही रोकडेच्या सरपंच रत्नाबाई कवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सन २०११ पासून सुरू असलेल्या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आशाताई रोकडे, मंदाताई रोकडे, कमलाबाई रोकडे, नर्मदाबाई कदम, लक्ष्मीबाई चव्हाण, मीराबाई रोकडे, शांताबाई घोडके, सुशीलाबाई रोकडे, कोकिळाबाई गिरी, बेबीबाई कवळे, मुनिफा बी शे. जमिल आदी महिला तसेच नवनिर्माण फाउंडेशनचे संचालक नितीन तायडे, प्रमोद रोकडे, गुलाबराव रोकडे, श्रीकृष्ण रोकडे, अनंता रोकडे, अंकुश अवघन, सचिन रोकडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राहुल सांगळे यांच्या सहभागाने अभियान राबविण्यात आले.

Web Title: Launch of Village Sanitation Campaign