नवजात शिशु, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST2021-06-23T04:26:56+5:302021-06-23T04:26:56+5:30

वाशिम : राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना ...

Intensive care unit for newborns, young children | नवजात शिशु, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग

नवजात शिशु, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग

वाशिम : राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचारासाठी १०० खाटांची स्वतंत्र सुविधा तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथेही लहान मुलांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी सर्व सोयी-सुविधायुक्त स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये १०० खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये नवजात शिशूंसाठी १० खाटांचा अतिदक्षता विभाग, त्यांच्या मातांसाठी स्वतंत्र सुविधा, लहान मुलांसाठी १० खाटांचा अतिदक्षता कक्ष, १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ऑक्सिजन सुविधा असलेल्या ३० खाटांचा स्वतंत्र कक्ष, १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रत्येकी २५ खाटांचा आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आले आहेत.

००००

आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण -डॉ. मधुकर राठोड

कोरोनाबाधित लहान मुलांसाठी तयार असलेल्या विविध काक्षांमधील सर्व खाटांना सेंट्रल पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच नवजात शिशू अतिदक्षता विभागात ६ इनक्यूबेटर, लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात १० व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ६ बालरोगतज्ज्ञ व १२ स्टाफ नर्सेससह आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू याठिकाणी नियुक्त केले जाणार असून सर्वांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

Web Title: Intensive care unit for newborns, young children