शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरकडून २५ लाखांचा अवैध औषधी साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:26 IST

Washim News : रुग्ण कल्याण समितीने २४ मे रोजी कारंजा येथील एका खासगी डॉक्टराच्या दवाखान्यात छापा टाकला.

कारंजा लाड : औषधीचा अवैध पद्धतीने साठा ठेवणे तसेच संशयास्पद वैद्यकीय पदवीप्रकरणी रुग्ण कल्याण समितीने २४ मे रोजी कारंजा येथील एका खासगी डॉक्टराच्या दवाखान्यात छापा टाकला. यावेळी २५ लाखांचा अवैध औषधी साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
कोरोनाकाळात कोविड रुग्णालयाची परवानगी नसतानाही काही जण रुग्णांवर उपचार करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने शोध मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. कारंजा येथील शोएब एम.खान सिद्दीकी यांचे रौशन क्लिनिक, गवळीपूरा येथे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी कालिदास तापी, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण जाधव, वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने, डॉ. किरण वाघमारे, नायब तहसीलदार विलास जाधव यांच्यासह चमूतील सदस्य व पोलीस कर्मचाºयांनी पाहणी केली असता, दोन रुग्णांना सलाईन सुरू असल्याचे दिसून आले. पदवीबाबत विचारणा केली असता, खात्रीदायक पदवी आढळून आली नाही तसेच त्यानंतर कोणतेही नूतनीकरण न केलेले प्रमाणपत्र दाखविले नाही. यामुळे रुग्णांना भरती करण्याचा, अ‍ॅलोपॅथिक औषधी देण्याचा, औषधाचा साठा करण्याचा अधिकार नसताना गैरकायदेशीरपणे कामकाज केल्याचे आढळून आले. काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्याचेही प्रथमदर्शनी निदर्शनास आले. यावेळी स्टेरॉईड, झोपेच्या व गुंगी आणणाºया गोळ्या, सलाईन यासह अन्य औषधीसाठा आढळून आला. यासंदर्भात तहसीलदार धिरज मांजरे व पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांना माहिती देताच, त्यांनी घटनास्थळ गाठून उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांना माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन अधिकारी मेतक यांना कारवाईबाबत सूचना देण्यात आल्या. २५ लाख किंमतीचा औषधीसाठा जप्त केला असून, रुग्ण कल्याण समिती व अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिमdoctorडॉक्टर