शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टर अकोल्यात, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री औरंगाबादेतच!

By admin | Updated: October 13, 2014 00:54 IST

समन्वयाचा अभाव; शिवराजसिंह चौहान राहिले ताटकळत.

अकोला: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना औरंगाबाद येथून अकोला येथे आणण्यासाठी मुंबईहून निघालेले हेलिकॉप्टर, पायलटचा गोंधळ आणि यंत्रणेतील समन्वयाच्या अभावामुळे औरंगाबादऐवजी थेट अकोल्यात पोहोचल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकारामुळे हेलिकॉप्टर अकोल्याहून परत येईपर्यंत चौहान यांना औरंगाबाद विमानतळावरच ताटकळत राहावे लागले आणि त्यामुळे त्यांची अकोल्यातील सभा तब्बल साडेतीन तास उशिरा सुरु झाली.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवराजसिंह चौहान यांची प्रचारसभा रविवारी सकाळी ९.३0 वाजता अकोल्यात आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी चौहान भोपाळहून औरंगाबाद येथे विमानाने आणि तेथून हेलिकॉप्टरने अकोला येथे येणार होते; मात्र त्यांच्या दौर्‍याचे व्यवस्थित समन्वय झाले नाही. त्यामुळे मुंबईहून निघालेले हेलिकॉप्टर औरंगाबादला न थांबता थेट अकोल्यात पोहोचले. औरंगाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या प्रतिक्षेत विमानतळावर ताटकळत बसलेले चौहान यांना ही बाब समजल्यानंतर, त्वरेने हालचाली झाल्या. त्यानंतर हेलिकॉप्टर अकोल्याहून पुन्हा औरंगाबाद येथे बोलविण्यात आले. या गोंधळात दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर अकोला विमान तळावर पोहोचले. त्यामुळे सभेला उशिर होऊन, चौहाण यांना भाषण आटोपते घ्यावे लागले.