आरोग्य विभागाची सतर्कता; कोरोना लसीचा एकही डोस गेला नाही वाया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 10:51 IST2021-01-20T10:51:02+5:302021-01-20T10:51:14+5:30

Corona Vaccine News दक्षता घेतल्याने डोस वाया गेला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी सांगितले.

Health department vigilance; No dose of Corona vaccine wasted! | आरोग्य विभागाची सतर्कता; कोरोना लसीचा एकही डोस गेला नाही वाया !

आरोग्य विभागाची सतर्कता; कोरोना लसीचा एकही डोस गेला नाही वाया !

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, पहिल्या दिवशी वाशिम, कारंजा व मंगरूळपीर अशा तीन केंद्रांत ३०० पैकी केवळ १६७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दरम्यान, आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे पहिल्या दिवशी कोरोना लसीचा एकही डोस वाया गेला नाही. 
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. 
जिल्ह्यात तीन केंद्रांत लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून, पहिल्या दिवशी १६७ जणांना लस दिली. लस वाया जाणार नाही, याची दक्षता घेतल्याने डोस वाया गेला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी सांगितले.


एका कुपीत १० डोस 
लसीच्या एका कुपीत दहाजणांना डोस देता येतो. ही कुपी काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानाही काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्ट जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Web Title: Health department vigilance; No dose of Corona vaccine wasted!