शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागणीसाठी पालक धडकले जिल्हा परिषदेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:21 IST

कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. लवकरच शिक्षक दिले जातील, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षांसह शिक्षणाधिकाºयांनी दिले.

ठळक मुद्देकामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त जिल्हा परिषद सदस्यांसह पालक धडकले जिल्हा परिषदेवर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात मंगळवार, १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. लवकरच शिक्षक दिले जातील, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षांसह शिक्षणाधिकाºयांनी दिले.खासगी शाळांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षण दर्जेदार नसते, अशी ओरड नेहमीच होत असते. या पृष्ठभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्येही भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला शासनातर्फे प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे या शाळांवर शिक्षकांची काही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी तासिका तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरात दिली होती. त्यानुसार वाशिम, कामरगाव व विठोली येथील कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र यासह महत्त्वाच्या विषयाच्या शिक्षकांची रिक्त पदे तासिका तत्वावर भरण्यात आली. मात्र, कामरगाव येथील शाळेवर शिक्षक रूजू झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य मिना भोने यांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शिक्षक मिळाले नसल्याने मंगळवारी पालकांसह भोने यांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या दालनात रिक्त पदांसंदर्भात शिक्षणाधिकाºयांसोबत चर्चा करण्यात आली. शिक्षक रूजू होत नसतील तर प्रतिक्षा यादीतील शिक्षकांना तेथे लवकरच नियुक्ती  द्यावी, अशा सूचना हर्षदा देशमुख यांनी केल्या. आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर कामरगाव येथे प्रतिक्षा यादीतील शिक्षक दिले जातील, अशी ग्वाही शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.