औषध विक्रेत्याने सापडलेली सोन्याची पोथ केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:30+5:302021-09-07T04:50:30+5:30

याविषयी सविस्तर वृत्त असे की, वाशिम नाका जिजाऊ चौक परिसरात रूपेश बाजाड यांचे वारकरी मेडिकल आहे. दुकानालगत त्यांचे मोठे ...

The gold poth found by the drug dealer was returned | औषध विक्रेत्याने सापडलेली सोन्याची पोथ केली परत

औषध विक्रेत्याने सापडलेली सोन्याची पोथ केली परत

याविषयी सविस्तर वृत्त असे की, वाशिम नाका जिजाऊ चौक परिसरात रूपेश बाजाड यांचे वारकरी मेडिकल आहे. दुकानालगत त्यांचे मोठे बंधू डॉ. सागर बाजड यांचे रुग्णालय आहे. या क्लिनिकमध्ये वैद्यकीय उपचार घेण्याकरीता शनिवारी (दि. ४) रिसोड तालुक्यातील सवड येथील वर्षा गणेश गव्हाणे नामक महिला आली होती. तपासणीनंतर औषधी घेऊन सदर महिला घरी परतली. त्याचवेळी रुपेश बाजड हे रुग्णालयात गेले असता एका कोपऱ्यात एक तोळे वजनाची सोन्याची पोथ त्यांना पडून असल्याचे लक्षात आले. त्याची माहिती रूपेश बाजड यांनी डॉ. सागर यांना दिली.

दरम्यान, सापडलेली पोथ नेमकी कुणाची आणि ती ज्यांची आहे, त्यांनाच मिळावी, या हेतूने बाजड यांनी दिवसभर रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांशी संपर्क करून कुणाचे काही हरविले का, याची माहिती घेतली. यादरम्यान सवड येथील वर्षा गव्हाणे यांनी त्यास दुजोरा दिला. सापडलेल्या पोथीचे अचूक वर्णन त्यांनी केले. खातरजमा झाल्यानंतर रूपेश बाजड यांनी महिलेचे पती गणेश गव्हाणे यांच्या पोथ स्वाधीन केली. रुपेश बाजड यांच्या प्रामाणिकतेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

050921\2435img_20210905_201616.jpg

गणेश गव्हाणे यांना सोन्याची पोथ परत करताना औषध विक्रेते रुपेश बाजड

Web Title: The gold poth found by the drug dealer was returned