शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भिंत अंगावर पडल्याने मुलगी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:45 IST

Washim News : भिंत अंगावर पडल्याने अडोळी येथील १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.

वाशिम : पुरातनकालिन मातीची भिंत अंगावर पडल्याने अडोळी येथील १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. पुढील उपचारार्थ या मुलीला नागपूर येथे हलविण्यात आले आहे.गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे घरात पाणी शिरणे, भिंतीची पडझड आदी घटना घडत आहेत. अडोळी येथे बुद्ध विहाराच्या सभोवताल पुरातनकालिन मातीची भिंत आहे. बुद्ध विहाराच्या मागच्या बाजूला प्रवीण किसन पडघान हे आपल्या कुटुंबासह राहतात. प्रवीण पडघान यांची पत्नी कविता आणि १० वर्षाची मुलगी परी या दोघी मायलेकी विहिरीवरून पाणी आणण्यासाठी जात असताना, अचानक परी हिच्या अंगावर भिंत कोसळली. यामध्ये ती पूर्णत: बुजून गेल्याने कविता पडघान यांनी आरडाओरड करताच, आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळ गाठले. माती उकरून गंभीर जखमी अवस्थेत परीला बाहेर काढण्यात आले. यावेळी ती बेशुद्धावस्थेत असल्याने तातडीने उपचारार्थ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे प्रथमोपचार करून अकोला येथे पाठविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. दानशूरांच्या मदतीची गरज!प्रवीण पडघान यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, ते नागपूर येथील उपचार व राहण्याचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. मुलीची मृत्यूशी झूंज सुरू असून, उपचाराच्या खर्चासाठी पडघान यांना दानशूरांच्या मदतीची गरज आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात