शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘बाप्पां’च्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज!

By admin | Updated: September 5, 2016 02:53 IST

वाशिम जिल्ह्यात ६३९ ठिकाणी होणार गणेश स्थापना.

वाशिम, दि. ४ : सुखकर्ता, दुखहर्ता गणरायाची सोमवार, ५ सप्टेंबर रोजी विधिवत स्थापना होणार असून, गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. यावर्षी १३ पोलीस स्टेशन परिक्षेत्रात एकंदरित ६३९ गणेश मंडळांकडून 'बाप्पा'ची विधिवत स्थापना केली जाणार आहे. घरगुती गणरायासोबतच सार्वजनिक गणेश मंडळे विविध ठिकाणी बसविणार्‍या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. वाशिम शहरासह जिल्ह्यात प्रत्येक शहरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक मोठी पर्वणी असते. या उत्सवासाठी सर्व तयारीनिशी सज्ज झाल्याचा दावा प्रशासनानेदेखील केला आहे. रस्ते दुरुस्ती, परवाने, होडिर्ंग्ज आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांची व्यवस्था स्थानिक प्रशासन करीत असते. उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, हा या सर्व तयारीचा उद्देश असतो. एकिकडे गणरायाच्या आगमनाचा उत्साह, तर दुसरीकडे यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सव थाटामाटात साजरा होणार आहे. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मुक्कामासाठी मंडप सजावटीची तयारी पूर्ण केली आहे. महागाईची झळ सोसूनही विविध प्रकारच्या मूर्तींची बुकिंग करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस कुमक तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.