विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST2021-09-03T04:44:43+5:302021-09-03T04:44:43+5:30

................. रेतीघाटांचे लिलाव करण्याची मागणी वाशिम : रेतीघाटांचे लिलाव गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाहीत. त्यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच ...

Frequent power outages | विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

.................

रेतीघाटांचे लिलाव करण्याची मागणी

वाशिम : रेतीघाटांचे लिलाव गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाहीत. त्यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांमधील घरकुले, शौचालयांच्या बांधकामावरही परिणाम होत आहे.

................

देयके अदा करण्याचे आवाहन

वाशिम : शहरातील घरगुती विद्युत ग्राहकांकडे लाखो रुपये थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले.

.................

प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन

वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, याकरिता मध्यंतरी दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर कारवाईत खंड पडल्यामुळे प्लास्टिक बंदीचा पूर्णत: फज्जा उडाला आहे.

..............

कर्ज तत्काळ मंजूर करण्याचे आवाहन

वाशिम : मुख्यमंत्री रोजगार योजनेतून निर्धारित निकषांप्रमाणे पात्र लाभार्थींना विनाविलंब कर्ज मंजूर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केले.

....................

रस्ता कामास गती देण्याची मागणी

वाशिम : वाशिम-अकोला महामार्गावरून आययूडीपी काॅलनीत जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या नूतनीकरणास सुरुवात झाली; मात्र हे काम संथगतीने होत असून गती देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

..................

‘फायर ऑडिट’ प्रक्रिया रखडली

वाशिम : व्यापारी संकुलांमध्ये अग्नी अवरोधक यंत्र बसवून दरवर्षी ‘फायर ऑडिट’ व्हायला हवे, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे; मात्र ही प्रक्रिया रखडली आहे.

................

बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी

वाशिम : एस. टी. महामंडळाच्या वाशिम, रिसोड आगारातील अकोला, शिरपूर मार्गावरच्या काही दैनंदिन बसफेऱ्या अनियमित आहेत. त्या नियमित सोडण्यात याव्यात, अशी मागणी आकाश कांबळे यांनी बुधवारी केली.

..................

रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यात पटवारी, कृषी सहायक, सचिव यासारख्या महत्त्वाच्या पदांवर प्रभारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर गावविकासाची भिस्त आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी राजाराम टोंचर यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

................

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अद्याप प्रतीक्षा

वाशिम : शासनाच्या विविध योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीच आता दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

Web Title: Frequent power outages