निवडणूक निरिक्षक जिल्ह्यात दाखल

By Admin | Updated: September 29, 2014 02:24 IST2014-09-29T02:24:11+5:302014-09-29T02:24:11+5:30

मिनाक्षी सुंदरम यांची सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती.

Filing of election observer in district | निवडणूक निरिक्षक जिल्ह्यात दाखल

निवडणूक निरिक्षक जिल्ह्यात दाखल

वाशिम: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून आर. मिनाक्षी सुंदरम यांची निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. ते २८ सप्टेबरपासून जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील ३३- रिसोड, ३४- वाशिम आणि ३५-कारंजा या तीनही विधानसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणेवर लक्ष ठेवणार आहेत.
निवडणूक यंत्रणेविषयी कोणत्याही सूचना अथवा तक्रारी असतील तर मतदारांनी त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे. ते विश्रामगृहातील सह्याद्री कक्षामध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यांच्याशी या ठिकाणी तसेच ९१३0४९२१७३ या भ्रमणध्वनीवर किंवा 0७२५२-२३२0७६ या दूरध्वनीवर संपर्क साधता येणार आहे.

Web Title: Filing of election observer in district