भूखंड घोटाळा प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST2021-09-03T04:44:23+5:302021-09-03T04:44:23+5:30

निवेदनात नमूद आहे की, रिसोड बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड घोटाळा झालेला आहे. त्याबाबत शासनाकडे गत तीन वर्षांपासून सतत ...

File charges against the culprits in the plot scam case | भूखंड घोटाळा प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा

भूखंड घोटाळा प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा

निवेदनात नमूद आहे की, रिसोड बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड घोटाळा झालेला आहे. त्याबाबत शासनाकडे गत तीन वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा उपनिबंधकांनी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समितीदेखील नेमलेली आहे. तपासादरम्यान घोटाळा झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यावरून प्रशासक व बाजार समितीच्या सचिवांनी दोषींवर गुन्हे नोंदविण्याकरिता रिसोड पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले; मात्र अद्यापर्यंत त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे घोटाळ्यासंबंधी व बाजार समितीमधील इतरही प्रकरणांतील पुरावे नष्ट होण्याची दाट शक्यता असून संबंधितांवर तत्काळ गुन्हे नोंदविण्यात यावे व चोख चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

....................

उपनिबंधक कार्यालय परस्पर विकले

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील उपनिबंधक कार्यालय परस्पर विकण्यात आले. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशा आशयाचे पत्र बाजार समितीचे सचिव विजय भीमराव देशमुख यांनी रिसोड पोलिसांत केली; मात्र चार दिवस होऊनही अद्याप कुणावरच गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे तालुक्यात विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. सर्व पुरावे असूनही विलंब लागत असल्याने मुख्य आरोपींना अभय देण्यात येत आहे का, असा सवालही अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

.......................

‘तो’ कर्मचारी बळीचा बकरा ठरल्याची चर्चा

भूखंड घोटाळाप्रकरणी बाजार समितीकडून कागदांची हेराफेरी करून माजी सभापतींना मदत केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले; मात्र खरे दोषी मोकळे असल्याने ‘तो’ कर्मचारी बळीचा बकरा ठरल्याची चर्चा रंगत आहे.

020921\img-20210902-wa0219.jpg

भूखंड घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल करा

Web Title: File charges against the culprits in the plot scam case