शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST

----- पोहरादेवी मंदिर परिसरात शुकशुकाट पोहरादेवी : कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे भाविक मंदिरांकडे येत ...

-----

पोहरादेवी मंदिर परिसरात शुकशुकाट

पोहरादेवी : कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे भाविक मंदिरांकडे येत नसल्याने पोहरादेवी मंदिर परिसरात सकाळ व सायंकाळची वेळ सोडल्यास दिवसभर शुकशुकाट राहात आहे.

---------------

ग्रामस्थांची कोरोना चाचणी

वाशिम : रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले परिसरातील कामगार गावी परत आले आहेत. त्यांची चाचणी आवश्यक असून, आरोग्य विभागाने कोरोना चाचणीवर अधिक भर दिला असल्याने आता गावागावांत ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली जात आहे.

------------------

प्रशासनाच्या निर्बंधांचे कठोर पालन

पोहा : राज्यात आढळत असलेले डेल्टा प्लसचे रुग्ण लक्षात घेता शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले. यात कारंजा तालुक्यातील पोहा परिसरात निर्बंधांचे कठोर पालन होेत असल्याचे १५ जुलै रोजी दिसून आले.

^^^^^^^^

अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई

वाशिम : कामरगाव परिसरातील गावांत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर धनज पोलिसांनी १४ आणि १५ जुलै रोजी कारवाई केली. अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकत दारू जप्त केली.

---------------

आसेगावात निर्जंतुकीकरण

वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि पावसाळ्यात पसरणारी घाण लक्षात घेता शेंदुरजना आढाव ग्रामपंचायतीने गावात गुरुवारपासून निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली. याअंतर्गत ट्रॅक्टरवर फवारणी यंत्र बसवून गावातील सर्व भागांत जंतूनाशक औषधी फवारण्यात येत आहे.

---------------

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

वाशिम : मानोरा तालुक्यात नागरिकांना कोरोनाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीपत्रकाचे वाटप केले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाकडून गुरुवारी करण्यात आले.