शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

सायकलरिक्षा होतेय हद्दपार

By admin | Updated: December 11, 2014 00:13 IST

सायकलरिक्षाची छम.छम दुर्मिळ, सायकलरिक्षास्वारांवर उपासमारीची वेळ.

शिखरचंद बागरेचा/वाशिम
छम.. छम.. छम.. छम.. अशा घुंगराच्या आवाजात प्रमुख रस्ते व गल्लीबोळीतून धावणारी सायकलरिक्क्षा आधुनिक युगातील ऑटोरिक्षांच्या भाउगर्दीमुळे काळाच्या ओघात संपूर्ण जिल्हय़ातूनच हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात लवकरच ही सायकलरिक्षा इतिहासजमा झाल्यास नवल वाटायला नको..!
काही वर्षापूर्वी जिल्हय़ात पाच हजाराचाच्याही पेक्षा जास्त संख्येत असलेल्या सायकल रिक्षांची संख्या कमी होवून सद्यस्थितीत फक्त पाचशेपर्यंत शिल्लक राहिली आहे. मागील पन्नास वर्षापासून जिल्हय़ातील प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण व स्वस्त असे साधन म्हणून जिल्हय़ातील रस्त्यावरुन गल्लीबोळात धावणार्‍या सायकलरिक्षा आता वर्तमान युगातील ऑटोरिक्षांच्या भाउ गर्दीत काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसत असून काही वर्षापूर्वी जिल्हय़ात पाच हजाराच्यावर असलेल्या या सायकल रिक्षांची संख्या कमी होवून पाचशेच्या घरात आली आहे. त्यामुळे सदर व्यवसाय का करुन मजुरी मिळविण्याच्या सायकलरिक्षा चालकांवर उ पासमारीची पाळी आली आहे.
अनेक वर्षापासून वाशिम जिल्हय़ात रोख मजुरींचे साधन म्हणून सायकल रिक्षांचा व्यवसाय सुरु होता. मानवाचे ओझे मानवानेच ओढून इच्छित ठिकाणी स्वस्त व सुरक्षित पोहोचविण्याचे साधन म्हणजे लोकप्रिय ठरलेली अशीही सायकल रिक्षा आहे. शहरात अगदी स्वस्तामध्ये इच्छित ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची पहिली पसंती सायकलरिक्षांना होती. तर पेट्रोल डिझेल या महागड्या तेल इंधनाची गरज सायकल रिक्षांसाठी आवश्यक नसल्यामुळे रोख मजुरी देणारे साधन म्हणून सायकलरिक्षाचालक सुद्धा याला पहिली पसंती देत होते. जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड व मालेगाव या सर्व ठिकाणी सर्वत्र सुमारे पाच हजाराचचे वर सायकल रिक्षा होत्या. मात्र कालांतराने आधुनिक युगात पेट्रोल डिझेलवर चालणार्‍या ऑटोरिक्षा हे पर्यायी व जलदगतीचे साधन उपलब्ध झाल्यामुळे ऑटोरिक्षांच्या या भाउगर्दीत सायकल रिक्षा आता काळाच्या पडद्याआड जावू लागल्या. सद्य परिस्थितीत केवळ कारंजा शहरात सर्वाधिक सायकल रिक्षा प्रवाशांच्या सेवेत असून वाशिम शहरासह संपूर्ण जिल्हय़ात सायकलरिक्षांची संख्या केवळ पाचशेच्या घरात शिल्लक राहिली आहे.