शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात विजेचे भारनियमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:44 IST

वाशिम : पावसाच्या सरासरीमध्ये घट झाल्याने उद्भवलेली पाणीटंचाई आणि पावसाळ्याचे दिवस असतानाही तापत असलेल्या कडक उन्हामुळे विजेची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी, विजेची गरज भरून काढण्यासाठी राज्यभरात ई, एफ आणि जी-१ ते जी-३ ग्रुपमध्ये प्रत्येकी सहा ते सात तासांचे वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळित  पाणीटंचाई, वाढत्या तापमानाचा परिणाम

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाच्या सरासरीमध्ये घट झाल्याने उद्भवलेली पाणीटंचाई आणि पावसाळ्याचे दिवस असतानाही तापत असलेल्या कडक उन्हामुळे विजेची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी, विजेची गरज भरून काढण्यासाठी राज्यभरात ई, एफ आणि जी-१ ते जी-३ ग्रुपमध्ये प्रत्येकी सहा ते सात तासांचे वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.राज्याला दैनंदिन किमान १७ ते १८ हजार मेगावॉट विजेची आवश्यकता भासते. ही गरज भागविण्यासाठी महावितरणच्या वतीने कोयना विद्युत निर्मिती केंद्रावर सर्वाधिक वीजनिर्मितीचा भार दिला जातो. याशिवाय विदर्भातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर महावितरणची दारोमदार असते. या दोन ठिकाणाहून किमान १0 ते १२ हजार मेगावॉट वीज दर दिवसाला उपलब्ध होत असते. उर्वरित ५ ते ६ हजार मेगावॉट वीज ही खासगी वीजनिर्मिती केंद्राकडून घेतली जाते. मात्र, सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असतानाही घटलेले पर्जन्यमान, दिवसेंदिवस अधिकच तापत असलेले ऊन आणि औष्णिक प्रकल्पांचे काही संच तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने विजेची मागणी आणि प्रत्यक्ष पुरवठा यात कमालीची तफावत निर्माण झालेली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने जी-१, जी-२, जी-३ ग्रुप या प्रकारात सात तासांचे आणि ‘एफ ग्रुप’मध्ये साधारणत: सव्वापाच तासांचे भारनियमन सुरू केले आहे. परिणामी, राज्यभरातील नागरिकांची तारांबळ उडत असून, लघू व्यवसाय संकटात सापडले आहेत. 

नापिकीचे संकटही झाले गडद!अमरावती विभागातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्वच ४४३ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ २६ टक्के जलसाठा शिल्लक असून, अधिकांश पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने खरिपातील पिके धोक्यात सापडली असताना ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची सोय आहे, त्यांना विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने यंदा नापिकीचे संकटही गडद झाले आहे. 

वीजपुरवठा कमी आणि मागणीमध्ये अचानक झालेली वाढ लक्षात घेऊन तातडीची उपाययोजना म्हणून राज्यभरात ई, एफ आणि जी या गटात विजेचे भारनियमन केले जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.- पी.एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण