शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळसदृष्य परिस्थितीत जगविली रस्त्याच्या कडेची झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:17 IST

यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवण्यासोबतच नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. शेतशिवारांमधील पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. मात्र, अशा दुष्काळसदृष स्थितीतही तालुक्यातील ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली निंबाची झाडे जगविण्याची किमया करून दाखविली. 

ठळक मुद्देपाणीटंचाई,  नापिकीचे संकट उभे ठाकले दुष्काळसदृष स्थिती ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतने जगविली रस्त्याच्या कडेला लावोली झाडे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवण्यासोबतच नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. शेतशिवारांमधील पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. मात्र, अशा दुष्काळसदृष स्थितीतही तालुक्यातील ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली निंबाची झाडे जगविण्याची किमया करून दाखविली. विविध कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून झाडांची बेसुमार कत्तल केली जात असल्याने गावेच्या गावे उजाड होण्यासोबतच पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. त्याचा थेट परिणाम पर्जन्यमानावर झाला असून पुर्वीच्या तुलनेत आता फारच कमी प्रमाणात पाऊस होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेवून शासनस्तरावरून ‘झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश देत वृक्षलागवडीची मोहिम राज्यभरात राबविण्यात आली. वाशिम जिल्ह्यातही वनविभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला बहुपयोगी वृक्षांची लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित गावे, ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आलेली आहे. मात्र, पाणीटंचाईचे कारण समोर करून अनेक ग्रामपंचायतींनी वृक्ष संगोपनाकडे दुर्लक्ष केले. ब्राम्हणवाडा ग्रामपंचायत मात्र त्यात अपवाद ठरली असून वाशिम-ब्राम्हणवाडा रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या झाडांना जगविण्याकरिता ग्रामपंचायतीने प्रयत्न चालविले आहेत.  विहिरी, हातपंपांमधून पाणी घेवून झाडांना पुरविले जात असल्याने ही झाडे  बहरल्याचे दिसून येत आहे.