दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल!

By Admin | Updated: November 1, 2016 00:02 IST2016-11-01T00:02:17+5:302016-11-01T00:02:17+5:30

फटाका विक्रीतून लाखोंचा धूर; सोने-चांदी बाजाराला झळाळी!

Diwali billions turnover turnover! | दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल!

दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल!

वाशिम, दि. ३१- घराघरात, मनामनात आनंद घेऊन आलेल्या ह्यदिवाळीह्णला फटाके व सोने-चांदी विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली. एकट्या वाशिम शहरात ३५ ते ४0 लाख रुपयांदरम्यान फटाक्यांची विक्री झाल्याचा दावा विक्रेत्यांनी केला.
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मानल्या जाणार्‍या दसर्‍याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात वाहन, घर, सोने-चांदी आदींमधून विक्रमी उलाढाल झाली होती. दिवाळीच्या उलाढालने हा विक्रम मोडीत काढला आहे. दिवाळीनिमित्तच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच शहरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. ग्राहकांची पसंत कॅश करण्यासाठी व्यापार्‍यांनीही विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेल्या आहेत. एकट्या दिवाळीच्या दिवशी वाशिम शहरातील फटाका बाजारात ३५ ते ४0 लाखांची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
गतवर्षी दुष्काळ व आर्थिक मंदी असल्यामुळे दिवाळीच्या बाजारपेठेत फारशी उलाढाल झाली नव्हती. यावर्षी मात्र सुरूवातीपासून निसर्गाची साथ लाभल्याने सर्वांमध्येच नवचैतन्य आहे. सोयाबीनच्या एकरी उत्पादनात वाढ असली तरी बाजारभाव कोसळल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता आहे. मात्र, दिवाळीच्या उत्साहावर विरजन नको, म्हणून शेतकर्‍यांनीदेखील दिवाळीच्या खरेदीत कंजूषी केली नसल्याचे दिसून येते.
विशेष करून वाहने, कपडे, फटाके, इलेक्ट्रानिक्स वस्तु, सोने-चांदी आदींच्या खरेदीला ग्राहकांनी अधिक पसंती दिली, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.
वाशिम येथील फटाका बाजारात जवळपास ४0 दुकाने थाटली होती. या दुकानांमधून शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात ३५ ते ४0 लाख रुपयांचे फटाके विकल्या गेले, असे विक्रेत्यांनी सांगितले. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा या पाच शहरातील बाजारपेठेत सरासरी २0 लाख रुपयांच्या फटाक्याची विक्री गृहित धरता एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून येते. संपूर्ण जिल्ह्या सव्वा ते दीड कोटींच्या आसपास फटाका बाजारात उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला.

Web Title: Diwali billions turnover turnover!