ढोरखेडा परिसर ५ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST2021-09-03T04:44:41+5:302021-09-03T04:44:41+5:30

मालेगाव : तालुक्यातील ढोरखेडा, खंडाळा, वाघी, कोठा, शेलगाव इंगोले येथील ग्रामस्थ गत ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने अंधारात ...

Dhorkheda area has been in darkness for 5 days | ढोरखेडा परिसर ५ दिवसांपासून अंधारात

ढोरखेडा परिसर ५ दिवसांपासून अंधारात

मालेगाव : तालुक्यातील ढोरखेडा, खंडाळा, वाघी, कोठा, शेलगाव इंगोले येथील ग्रामस्थ गत ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने अंधारात राहत आहेत. काेणीही लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ अखेर वीज वितरण कार्यालयावर गेले. या वेळी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोले यांनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू केले होते . त्या वेळी ही नेहमीसारखे आश्वासन देऊन परत पाठवले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अंधार असल्यामुळे घरात साप, विंचू आदी किडे-कीटक निघू शकतात, यामुळे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. शेतीची कामेसुद्धा सुरू आहेत, मात्र तालुक्यातील ढोरखेडा, खंडाळा, वाघी, कोठा, शेलगाव इंगोले येथे गेल्या पाच दिवसांपासून वीज बंद आहे. यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले असून ते वीज वितरण कार्यालयावर जाब विचारण्यासाठी पोहोचले.

अभियंता जीवनानी यांच्या मनमानी कारभारामुळे लाखो रुपयांची केबल टाकलेली असताना केवळ जोडणीअभावी रोज वीज गायब असते. अधिकाऱ्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देतात. यामुळे आम्ही सर्व नागरिक त्रस्त झालो असून ताबडतोब वीजपुरवठा सुरळीत करून घ्यावा.

- सुनीता बबनराव मिटकरी

सरपंच, ग्रा.पं. ढोरखेडा

...............

ढोरखेडा गावात अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्न कायम आहे. त्यासाठी आम्ही मुक्काम ठाेकाे आंदोलनास सुरुवात केली होती, मात्र अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही परत आलो. जर लवकरात लवकर जोडणी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- दामोदर इंगोले,

शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष, वाशिम

020921\img-20210902-wa0042.jpg

आंदोलन

Web Title: Dhorkheda area has been in darkness for 5 days