ढोरखेडा परिसर ५ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST2021-09-04T04:48:49+5:302021-09-04T04:48:49+5:30

मालेगाव : तालुक्यातील ढोरखेडा, खंडाळा, वाघी, कोठा, शेलगाव इंगोले येथील ग्रामस्थ गत ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने ...

Dhorkheda area has been in darkness for 5 days | ढोरखेडा परिसर ५ दिवसांपासून अंधारात

ढोरखेडा परिसर ५ दिवसांपासून अंधारात

मालेगाव : तालुक्यातील ढोरखेडा, खंडाळा, वाघी, कोठा, शेलगाव इंगोले येथील ग्रामस्थ गत ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने अंधारात राहत आहे. काेणीही लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ अखेर वीज वितरण कार्यालयावर गेले. यावेळी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोले यांनी कार्यलयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी ही नेहमीसारखे आश्वासन देऊन परत पाठवले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अंधार असल्यामुळे घरात साप, विंचू, आदि किडे कीटक निघू शकतात, यामुळे जीविताला धोका निर्माण होऊ शकते. शेतीची कामे सुध्दा सुरू आहेत. मात्र तालुक्यातील ढोरखेडा, खंडाळा, वाघी, कोठा, शेलगाव इंगोले गेल्या पाच दिवसांपासून वीज बंद आहे. यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी वीज वितरण कार्यालयावर जाब विचारण्यासाठी पोहचले. अभियंता जीवनानी यांच्या मनमानी कारभारामुळे लाखो रुपयांचा केबल टाकलेला असताना केवळ जोडणीअभावी रोज वीज खंडित हाेताे.

वीज पुरवठ्याबाबत अधिकारी यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देतात. यामुळे आम्ही सर्व नागरिक त्रस्त झालो असून ताबडताेब दखल न घेतल्यास आंदाेलन करणार आहाेत.

सुनीता बबनराव मिटकरी

सरपंच, ग्रा.पं. ढोरखेडा

ढोरखेडा गावात अनेक दिवसांपासून विजेचा प्रश्न कायम आहे, त्यासाठी आम्ही मुक्काम ठाेकाे आंदोलनास सुरुवात केली होती, मात्र अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही परत आलो. जर लवकरात लवकर जोडणी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

दामोदर इंगोले, शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष, वाशिम

020921\5229img-20210902-wa0042.jpg

आंदोलन

Web Title: Dhorkheda area has been in darkness for 5 days