शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:51 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्‍यांनी १४ सप्टेंबर रोजी  सेतू केंद्रांवर एकच गर्दी केली होती. दरम्यान, शासनाने कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी सात दिवस मुदतवाढ दिली आहे; परंतु हा निर्णय उशिरा जाहीर झाल्याने १५ ऑगस्ट रोजीची पूर्वीची अंतिम मुदत लक्षात घेत शेतकर्‍यांची धावपळ सुरू होती.

ठळक मुद्देशासनाची मुदतवाढशेतकर्‍यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्‍यांनी १४ सप्टेंबर रोजी  सेतू केंद्रांवर एकच गर्दी केली होती. दरम्यान, शासनाने कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी सात दिवस मुदतवाढ दिली आहे; परंतु हा निर्णय उशिरा जाहीर झाल्याने १५ ऑगस्ट रोजीची पूर्वीची अंतिम मुदत लक्षात घेत शेतकर्‍यांची धावपळ सुरू होती.  ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी पती-पत्नी दोघेही, त्यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांकासह उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतकर्‍यांचे कर्ज खाते क्रमांक, बचत खाते क्रमांक आदी माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक आहे. दरम्यान, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर अद्याप अनेक शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया विविध कारणांमुळे पूर्ण झालेली नाही. ऑनलाइन अर्ज भरल्याशिवाय कर्जमाफी अथवा २५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही. तसेच बँकेमध्ये ऑफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकर्‍यांनीसुद्धा ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा पूर्वी १५ सप्टेंबरपर्यंतच असल्याने त्यानंतर ऑनलाइन अर्ज करता येणार नाहीत, या भितीमुळे शेतकर्‍यांनी सेतू केंद्रांवर गुरुवार १४ ऑगस्ट रोजी मोठी गर्दी केली होती. आता ही मुदत ७ दिवस वाढविण्यात आली असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर संबंधित केंद्रचालकाकडून अर्ज भरल्याची पावती मिळेल. यापूर्वी भरण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या त्रुटींची दुरुस्तीही पुढील सात दिवस करण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांना  दिलासा मिळाला आहे.