शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४९१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 6:29 PM

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू तर ४९१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ मे रोजी पॉझिटिव्ह आला.

वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एकाचा मृत्यू तर ४९१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३१६०५ वर पोहोचला आहे.वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासियांची चिंता वाढत आहे. शनिवारीदेखील वाशिम तालुक्यात १२३ जण कोरोनाबाधित आढळून आले. आणखी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली. एकूण ४९१ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १२३, मालेगाव तालुक्यातील ५३, रिसोड तालुक्यातील ५४, मंगरूळपीर तालुक्यातील ७२, कारंजा तालुक्यातील ६८ आणि मानोरा तालुक्यात ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.  जिल्ह्याबाहेरील ३४ बाधितांची नोंद झाली असून ५२४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. पोहरादेवीत पुन्हा कोरोना रुग्ण वाढलेमानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे दोन महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. आता पुन्हा शनिवारी पोहरादेवी येथे २१ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, गावात तळ ठोकून आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथेदेखील १८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या