शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या पित्यास जन्मठेप

By admin | Updated: November 30, 2014 00:24 IST

अकोला सत्र न्यायालयाचा निर्णय; अनाथ मुलीला भीक मागण्यासही केले होते बाध्य.

अकोला - अनाथ मुलीला भीक मागण्यास बाध्य करून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणार्‍या मानलेल्या नराधम बाप मधुकर मानाजी आठवले याला जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आणि दंड न भरल्यास आणखी दोन महिन्याची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने सुनावली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषिनगर येथील रहिवासी मधुकर मानाजी आठवले (६0) याने मानलेल्या १५ वर्षीय मुलीला भीक मागण्यास बाध्य केले होते. तसेच २६ सप्टेंबर २0१२ च्या सहा महिन्यापूर्वी ही मुलगी आठवले याच्या नातेवाईकाच्या घरी झोपलेली असताना आठवले याने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या प्रकाराला मुलीने विरोध केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने कधीही विरोध न केल्याने या नराधमाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. २६ सप्टेंबर २0१२ रोजी तिने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे मधुकर आठवले याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ५0६, नुसार गुन्हा दाखल केला. त्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. तेव्हापासून आरोपी प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान पीडित मुलगी, तिचे नातेवाईक, डॉक्टर आणि तपास अधिकारी यांच्या बयाणावरुन आणि ठोस पुरावे मिळाल्याने मधुकर आठवले याच्याविरुद्ध आणखी कलम ३६३ व बैगिंग अँक्टनुसार गुन्हे वाढविण्यात आले. पोलिसांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली असून, शनिवारी मधुकर आठवले याला शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयाने मधुकर आठवलेस कलम ३७६ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले.