बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला!

By Admin | Updated: September 3, 2016 02:00 IST2016-09-03T02:00:43+5:302016-09-03T02:00:43+5:30

पोळ्याच्या दिवशी युवक बुडाला.

The body of the missing boy found! | बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला!

बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला!

मालेगाव (जि. वाशिम), दि. २ : पोळ्याच्या दिवशी पोहण्यासाठी केळी धरणात उतरलेला युवक बेपत्ता होता. शोधकार्यादरम्यान, आज २ सप्टेंबरला या युवकाचा मृतदेह आढळून आला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, अमोल प्रल्हाद साखरे (वय २८ वर्षे) हा युवक १ सप्टेंबरला दुपारी केळी धरणात पोहण्यासाठी गेला होता. बराचवेळ तो बाहेर न आल्याने काही युवकांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३0 वाजता बाश्रीटाकळी येथील आपत्कालिन पथकाला पाचारण करून शोध घेण्यात आला असता, अमोलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे अमोलच्या कुटुंबावर शोककळा पसरली. तहसीलदार आर.बी. जस्वत यांच्यासह पोलीस निरीक्षक ठाकूर, तलाठी अमोल पांडे, पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकार्यांंनी मदतकार्य केले.

Web Title: The body of the missing boy found!