दारू अड्डय़ावर धाड; लाखाचा ऐवज जप्त

By Admin | Updated: April 2, 2017 02:25 IST2017-04-02T02:25:35+5:302017-04-02T02:25:35+5:30

वाशिम तालुक्यातील मोहगव्हाण शिवारात धाड; १ लाख ३ हजार ७५0 रुपयांचा ऐवज जप्त.

Arms on the liquor bar; Lakho's case seized | दारू अड्डय़ावर धाड; लाखाचा ऐवज जप्त

दारू अड्डय़ावर धाड; लाखाचा ऐवज जप्त

वाशिम, दि. १- वाशिम तालुक्यातील मोहगव्हाण शिवारातील धरणाजवळील नाल्याच्या काठावर हातभट्टी दारू अड्डय़ावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख ३ हजार ७५0 रुपयांचा ऐवज जप्त केल्याची कारवाई १ एप्रिलला सकाळच्या सुमारास केली. अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहगव्हान शिवारातील धरणाजवळील नाल्याच्या काठावर हातभट्टी दारू अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून शनिवारी सकाळच्या सुमारास हातभट्टी दारू अड्डय़ावर धाड टाकली. यावेळी मोहाफुल सडवा व साहित्य असा एकूण १ लाख ३ हजार ७५0 रुपयांचा ऐवज जप्त करून दोन आरोपीला अटक केली. अनसिंग पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामेश्‍वर चव्हाण, जमादार संजय नंदकुले, प्रकाश सरनाईक, लक्ष्मण कोल्हे, रामेश्‍वर जगताप, राजेश राठोड, गजानन सोनुने आदींनी केली.

Web Title: Arms on the liquor bar; Lakho's case seized