किन्हीराजा येथे आणखी एक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:42 IST2021-04-22T04:42:05+5:302021-04-22T04:42:05+5:30

०००० उंबर्डा परिसरातील बाजारपेठ कडकडीत बंद वाशिम : कारंजा तालुक्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढतच असून, २० एप्रिलपासून सकाळी ७ ...

Another patient at Kinhiraja | किन्हीराजा येथे आणखी एक रुग्ण

किन्हीराजा येथे आणखी एक रुग्ण

००००

उंबर्डा परिसरातील बाजारपेठ कडकडीत बंद

वाशिम : कारंजा तालुक्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढतच असून, २० एप्रिलपासून सकाळी ७ ते ११ या वेळेतच अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या नियमाचे पालन करीत सकाळी ११ वाजतानंतर उंबर्डा बाजार परिसरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती.

००

बसस्थानकात सुविधांचा अभाव

वाशिम : मालेगाव येथील तहसील कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या बसस्थानकात विविध समस्या उद्भवल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसस्थानक परिसरात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी सुरज सकटे यांनी आगारप्रमुखांकडे केली.

०००

मेडशी येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामपंचायतने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नागरिकांनीदेखील आवश्यक ती काळजी घ्यावी, गावात कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन ग्रामपंचायतने बुधवारी केले.

Web Title: Another patient at Kinhiraja