महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत ४५ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:43+5:302021-09-07T04:50:43+5:30

जिल्ह्यातील अमानी महामार्ग पोलीस केंद्राच्या ताफ्यात २०१९ मध्ये समाविष्ट झालेल्या ‘स्पीडगन व्हॅन’मुळे धावत्या गाडीचा वेग मोजण्याची प्रक्रिया सोपी झाली ...

45 lakh for speeding on highways! | महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत ४५ लाख !

महामार्गावर वाहनाचा वेग वाढविल्याची किंमत ४५ लाख !

जिल्ह्यातील अमानी महामार्ग पोलीस केंद्राच्या ताफ्यात २०१९ मध्ये समाविष्ट झालेल्या ‘स्पीडगन व्हॅन’मुळे धावत्या गाडीचा वेग मोजण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. २०२० या वर्षात या माध्यमातून तब्बल ९६ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. चालूवर्षीही दंडाची रक्कम आतापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक आहे. रस्त्यावरून धावणारे वाहन ३०० मीटरपर्यंत पुढे गेले तरी स्पीडगनने ते कॅच करता येत असल्याने वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन करण्याची हिंमत करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

................

महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड

महिना दंड

जानेवारी ५ लाख

फेब्रुवारी ६ लाख

मार्च ५.४० लाख

एप्रिल ४.३० लाख

मे ७ लाख

जून ८.३० लाख

जुलै ५.१० लाख

ऑगस्ट ४ लाख

....................

(बॉक्स)

धावत्या गाडीचा मोजला जातो वेग

अमानी महामार्ग पोलीस केंद्राला शासनाने ‘ओव्हर स्पीड’ धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी ‘इंटरसेप्टर’ प्रणाली असलेले चारचाकी वाहन दिले. चारचाकी वाहनांसाठी ७४ किलोमीटर प्रतितास तर दुचाकी, ट्रक आणि एस.टी. बसला ६३ किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा ठरवून दिलेली आहे. स्पीडगनने हा वेग मोजला जातो.

.............

एसएमएसवर मिळते पावती

महामार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून दंड वसूल करणे अशक्य आहे. त्यामुळे स्पीडगनने कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमेची पावती एसएमएसव्दारे पाठविण्यात येते. त्यास वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसादही मिळत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून मिळाली.

Web Title: 45 lakh for speeding on highways!