शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वसईची शाळा केली नापास, बोर्डाचा गोंधळी कारभार, वेबसाइटवर चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:12 IST

दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

पारोळ - दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात वसई तालुक्यातील जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेतील मुले पास असताना सुद्धा या शाळेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईट वर शुन्य टक्के लागल्याचे दाखवल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. दहावीच्या परीक्षेत या शाळेतील मुलांना बार्डाने चक्क एटीकेटी लावल्याने पालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.या निकालात वसई तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याचे दिसून येत असताना जूचंद्र येथील गिरीजा म्हात्रे शाळेचा निकाल मात्र बोर्डाच्या चुकी मुळे ० टक्के लागल्याचे जाहीर झाल्याने पालकांना आणि शाळा व्यवस्थापनेला मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. या शाळेतील ४१ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते ते सर्व नापास असल्याचे दाखिवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. ८२ टक्के गुण मिळालेला विद्यार्थीही बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे नापास दाखिवण्यात आला होता. मुळात शाळेत जो विषय शिकविला जात नाही त्या विषया बाबत हा घोळ झाल्याचे समोर आले आहे.या बाबत शाळा व्यवस्थापनाने परीक्षे पूर्वीच बोर्डाला पत्र लिहून कळविले होते. तसेच ही चूक दुरुस्त करण्यासाठी शुल्क ही भरले असताना बोर्डाच्या गलथान कारभारामुळे येथील मुलांना त्यांच्या पालकांना आणि शाळा व्यवस्थापनाला नाहक त्रास सहन करावा लागला. मुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असा रिझल्ट देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्क लिस्टवर प्रमोटेड असे दाखविण्यात आले आहे. तसेच काहींना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एटीकेटी लावल्याने शिक्षण क्षेत्रातील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डा कडून सांगण्यात आल्याचे समजते. मात्र, या बाबत तात्काळ खुलासा झाला नाही.शाळेतील परीक्षा दिलेल्या ४१ विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकला नाही. शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. ८२ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी शाळेचा टॉपर आहे. केवळ ग्रेड सब्जेक्ट म्हणून असलेल्या शाळेच्या वर्कएज्युकेशन विषयाचे गुण न दिल्याने व तसे बोर्डाला कळवले असतांनाही निकाल बोर्डाच्या साईडवर शुन्य टक्के दिल्याने बोर्डाचा गलथानपणा दिसून येत आहे.बोर्डाच्या लेखी तांत्रिक चूकामुळात दहावीच्या मुलाला पास अथवा नापास असे निकालपत्र देण्यात येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर प्रमोटेड असे दाखिवण्यात आले आहेया बाबत शाळा व्यवस्थापनाने बोर्डाशी संपर्क केला असता ही तांत्रिक चूक असल्याचे बोर्डा कडून सांगण्यात आल्याचे समजते. मात्र त्यामुळे अनेकांना त्रास झाला.बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे आमच्या शाळेची बदनामी झाली असून त्याचा फटका आमच्या रेप्युटेशनला बसला आहे. आम्ही सर्व बाबीची पूर्तता केली असतानाही बोर्डाने त्या कडे लक्ष न दिल्याने शुन्य टक्के निकाल दिला आहे. आमची सर्व मुले पास असतानाही त्यांना नापास दाखविण्यात आल्याने आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. -जनार्दन म्हात्रे,संस्थापक अध्यक्ष गिरीजा म्हात्रे विद्यालय)

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या