शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत टँकर लॉबीला सुगीचे दिवस

By admin | Updated: March 23, 2016 01:58 IST

सततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते.

शशी करपे, वसईसततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून टँकर पुन्हा धावू लागले आहेत. याघडीला तालुक्यात टँकरची संख्या साडेसहाशेच्या घरात पोचली आहे. सध्या दहा हजार लिटरचा एकेक टँकर दिवसाला किमान चार फेऱ्या मारतात. किमान ५० हजारांहून अधिक कुटुंबे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एकेकाळी टँकरमुळे वसईत दरवर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा. सूर्या पाणी पुरवठा योजनेने टँकरला हद्दपार केले होते. पण, लोकसंख्या वाढल्यामुळे टँकर पुन्हा धावू लागले आहेत. तालु्नयात साडेसहाशेहून अधिक टँकर असून सध्या पाण्याची गरज असल्याने दहा हजार लिटरचा एकेक टँकर दिवसाला चार फेरा मारतो. सर्वाधिक ३५० च्या आसपास टँकर एकट्या नालासोपारा परिसरात धावतात, असे नालासोपारा टँकर असोसिएशनचे म्हणणे आहे. पूर्वी टँकर पश्चिम पट्ट्यातून पाणी उपसा करीत असत. बेसुमार उपशामुळे पाण्याची पातळी खाली गेल्याने तिथून टँकरला बंदी घालण्यात आली. आता धानीव, गोखीवरे, वालीव, पेल्हार, पारोळ, पेल्हार, उसगाव, उसगाव नदी, तानसा नदी, शिवनसई, खानिवडे, चंदनसार, भाटपाडा, विरार पूर्वेकडील फुलपाडा याभागातील विहीर आणि बोअरवेलमधून टँकर पाणी भरतात. खाजगी विहीर आणि बोअरवेल मालक पैशासाठी बेसुमार पाणी उपसा करु लागल्याने याभागातील पाण्याची पातळी खालावली असून गावकरी चिंतेत सापडले आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी टंँकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी दूषित तरी दर मात्र वाढतेचटँकर लॉबी पैसा कमावण्याच्या उद्देशाने मिळेल तिथून पाणी भरून आणून शहरात विकतात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने दूषित पाणी पिण्याशिवाय लोकांना पर्याय नसते. एरव्ही पावसाळा ते फेब्रुवारीपर्यंत टँकरचे दर ९०० ते १२०० रुपये असतात. आता टँकरचे दर वाढू लागले असून सध्या किमान १५०० रुपये आकारले जात आहे. जसजशी पाणी टंचाईची झळ वाढायला सुरुवात होईल तसतसा टँकरचा दर दोन हजार रुपयांच्या घरात पोचलेला असेल.अनेक टँकर जुनाट, गळके, अनफिट आरटीओ कार्यालयामध्ये सुमारे २२५ टँकरची नोंद आहे. काही टँकरची नोंद ठाणे येथे झाल्याचे गृहीत धरले तरी किमान तीनशे टँकर बेकायदेशिर धंदा करीत आहेत. मुंबईत आठ वर्षांपेक्षा जुने झालेले ट्रक वापरण्यास बंदी आहे. याच ट्रकमध्ये फेरबदल करून त्याचे टँकरमध्ये बेकायदेशिरपणे रुपांतर करून वसईत त्याचा वापर केला जातो. अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. याची माहिती आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना आहे. पण, रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालवून दर महिन्याला दोन-तीन अपघात करणाऱ्या, वर्षाला किमान दोन-तीन लोकांचा जीव घेणाऱ्या टँकरविरोधात आरटीओ अथवा पोलीस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.