शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

वसई परिवहनचा अखेर संप मागे, मागण्या मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 00:16 IST

बुधवारी १५ जानेवारीच्या मकरसंक्रांतीपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. या आंदोलनात ७०० च्या वर वाहक आणि चालक सहभागी झाले होते.

- प्रतीक ठाकूरविरार : वसईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून परिवहन कर्मचाऱ्यांचा सुरू घेतलेला संप अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. पालिकेने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने संप मागे घेत कामगार कामावर परतले आहेत. त्यामुळे शहरातील बससेवा सुरळीत झाली असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.बुधवारी १५ जानेवारीच्या मकरसंक्रांतीपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. या आंदोलनात ७०० च्या वर वाहक आणि चालक सहभागी झाले होते. महापलिका व कर्मचाºयांमध्ये बोलणी होत असून सुद्धा संपाचा तिढा सुटत नव्हता. श्रमजीवी संघटनेचे नेते व वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी वसईच्या डेपोत आंदोलक कामगारांची भेट घेतली. तसेच त्याच संध्याकाळी महापालिकेच्या अधिका-यांची बैठक झाली. यामध्ये भागीदारी ट्रान्सपोर्टचे मालक मनोहर सकपाळ यांनी सद्यपरिस्थितीत खर्चाचा ताण येतोय, त्यामुळे मी परिवहन सेवा चालवू शकत नाही. त्यामुळे ठेकेदाराने प्रकरणावरून हात वर केल्याने संप सुरूच होता.चौथ्या दिवशी कामगारांनी वसई डेपोत ठिय्या मांडला होता. दरम्यान संध्याकाळी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत कामगारांच्या चारही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत एकरकमी पगार कर्मचाºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. थकीत भविष्य निर्वाह निधीची रक्कम सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच सोसायटीची १४ लाखांची रक्कम २८ जानेवारीपर्यंत जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या कर्मचाºयांचा महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नसेल त्यांचा भत्ता फेब्रुवारीपर्यंत जमा करण्यात येणार आहे.कामगारांच्या या सर्व मागण्या मान्य झाल्याने चौथ्या दिवशी संध्याकाळी संप मागे घेतला. सर्व मागण्या मान्य झाल्याने कामगार कामावर परतले असून परिवहन सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, कामावरून परतण्याच्या वेळी हा संप मिटल्याने कामगारांसह प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मचा-यांच्या मागे महापालिका सदैव उभी असून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.- प्रीतेश पाटील, परिवहन सभापती

टॅग्स :Vasai Virarवसई विरार