शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा, पारगाव पुलांना धोका!

By admin | Updated: October 10, 2016 03:12 IST

वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला धोका निर्माण झाला

पालघर : वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला धोका निर्माण झाला आहे. सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या प्राणहाणीची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यात होऊ नये यासाठी पालघरच्या तहसीलदारांनी खाडी शेजारी राहणाऱ्या गावात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे. अपघाताच्या शक्यतेचा विचार करुन भविष्यात रस्ते, रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेची बाब शासन स्तरावरून गांभीर्याने घेतली गेली आहे. पालघर तालुक्यातील सफाळे-वैतरणा खाडीवरील रेल्वे पूल क्र . ९२ व ९३ च्या दोन्ही बाजू कडील ६०० मीटर परिसरातून बेकायदेशीररित्या रेती उत्खनन केले जात असल्याने रेल्वे गाड्यांना होणारा धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या सुचने वरून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा रेती उत्खननास पूर्णत: बंदी घातली आहे. ह्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ‘आसनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या’ नुसार मनाई आदेश काढले होते. तरीही काही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील काही ग्रामस्थ विनापरवाना रात्रंदिवस खाडीतून अनिधकृत पणे रेती उत्खनन करून साठवणूक, वाहतूक आणि विक्र ी करीत असल्याचे दिसून आले होते.एका बाजूला कायद्याच्या कठोर अंमल बाजावणीची ताकीद देताना ह्या बेकायदेशीर रेती उत्खनना मुळे वैतरणा खाडीवरील, पारगाव पूल कोसळल्यास मोठ्या जीवित हानीला आपल्याला सर्वाना सामोरे जाण्याची पाळी ओढवू शकते ह्याची जाणीव तहसीलदारांनी उपस्थितांना करून दिली. दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास आणि त्यात आपलेच नातेवाईक बळी गेल्यास आपल्या हाती पश्चातापा शिवाय काहीही उरणार नसल्याचे वास्तव रुपी चित्र समोर उभे केले. त्यामुळे महाड च्या दुर्घटनेतून आपण काही धडा घेऊन योग्य ती काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्यावर फार मोठी आपत्ती ओढवू शकते ह्याची जाणीवही तहसीलदार सागर ह्यांनी ग्रामस्थांना करून दिली. ह्यावेळी उपस्थितांनी आपण अशी चूक करणार नसल्याचा विश्वास तहसीलदारांना दिला. (प्रतिनिधी)तडीपारीची कारवाई करणारह्या बेकायदेशीर उत्खनना मुळे भारतीय रेल्वे कायदा कलम, पर्यावरण कायदा कलम, भारतीय दंड विधान संहिता कलम व मोक्का कायद्या नुसार गंभीर गुन्हे दाखल करून तडीपारी सारख्या गंभीर गुन्ह्यांची कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार महेश सागर ह्यांनी बहाडोली, खांमलोली, दहिसर तर्फे मनोर, सोनावे, पारगाव, दारशेत उंबरपाडा ई. भागात सभा घेऊन ग्रामस्थांना दिली.