शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:07 IST

Mokhada: एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडल्याने त्या प्रसूत महिलेला बाळ व कुटुंबीयांसह दोन किमीची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना मोखाड्यात घडली आहे. 

- रवींद्र साळवे मोखाडा - एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडल्याने त्या प्रसूत महिलेला बाळ व कुटुंबीयांसह दोन किमीची पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना मोखाड्यात घडली आहे. 

मोखाडा तालुक्यातील आमले येथील प्रसूत महिला सविता बारात (सासरचे नाव सविता मनोज बांबरे) हिला बुधवार १९ नोव्हेंबर रोजी  मोखाडा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी  भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल केले, तिची प्रसूती सुखरूप झाली. रविवार २४ नोव्हेंबर रोजी तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका चालकाने त्यांना गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर  उतरवून रुग्णवाहिका निघून गेली. प्रसूत महिला सविता बारात हिच्यासोबत आई व सासू होत्या. त्यांना व प्रसूत महिलेला बाळाला घेऊन दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. 

घटनेबद्दल संताप;कारवाईची मागणीया सर्व घटनेचा तिच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला  असून कारवाईची मागणी केली आहे. आम्हाला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यातच सोडले. यामुळे आम्हाला दोन किमी पायपीट करावी लागल्याचे प्रसूत महिलेचे पती मनोज बांबरे यांनी सांगितले. 

त्या प्रसूत महिलेच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला खोडाळापर्यंत सोडा  तिथून पीएसीच्या गाडीतून आम्ही जाऊ असे सांगितले; परंतु तिथे गेल्यावर पीएसीचे वाहन नसल्याने आम्हाला आमले फाट्यापर्यंत सोडा असे सांगितले व त्यांना आमले फाट्यावर सोडले. तसेच वाहनचालक बोलले तुम्हाला घरापर्यंत सोडू का? तर कुटुंबीयांनी सांगितले  की, रस्ता लहान असल्याने गाडीला वळण घेता येणार नाही. त्यामुळे त्यांना आमले फाट्यापर्यंत त्यांच्या सांगण्यावरून सोडण्यात आले.- संजय कावळे, वैद्यकीय अधीक्षक, कुटीर रुग्णालय  जव्हार.

English
हिंदी सारांश
Web Title : New mother forced to walk 2km after ambulance drop-off.

Web Summary : A new mother in Mokhada, discharged from the hospital, was forced to walk two kilometers with her baby after the ambulance driver left her midway. Family expresses outrage, demanding action.
टॅग्स :Vasai Virarवसई विरार