शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Loksabha Bypoll Result 2018 : नरेंद्र-देवेंद्र प्रसन्न; पालघरमध्ये जिंकले भाजपाचे 'राजेंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 18:12 IST

काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. 

पालघर: भाजपानं पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर शिवसेनेनं आव्हान उभं केलं होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा 44 हजार 589 मतांनी पराभव केला. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पालघर निवडणुकीत पराभव झाल्याचं जाहीर झालं आहे, पण मी पराभव मान्य करत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते पिछाडीवर गेले आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दुसऱ्या क्रमांकावर आले. मात्र वनगा यांना एकाही फेरीत गावित यांना मागे टाकता आलं नाही. गावित यांना दुपारी एकपर्यंत 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 9 हजार मतं मिळाली. 

Live Updates:

- शिवसेनेचं पालघरमध्ये काम सुरूच राहील

-निवडणूक आयोगाला लोकशाहीची बुज असेल तर पालघरमधल्या प्रकरणाचा छडा लावा. तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करा- उद्धव ठाकरे

- भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित ४४ हजार ५८९ मतांनी विजयी

- 23 व्या फेरी अखेर भाजपाच्या राजेंद्र गावित यांच्याकडे 31 हजार 616 मतांची आघाडी

- सतराव्या फेरीनंतरही गावितांची आघाडी कायम; गावितांना 1 लाख 90 हजार 492 मतं, श्रीनिवास वनगा यांना 1 लाख 68 हजार 477 मतं; बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 1 लाख 42 हजार 350 मतं.

- 16 व्या फेरीनंतर गावित 1 लाख 79 हजार 344 मतांसह आघाडीवर; श्रीनिवास वनगा 1 लाख 56 हजार 757 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर

- पंधराव्या फेरीनंतर राजेंद्र गावित यांच्याकडे 29 हजार 697 मतांची आघाडी

- दहाव्या फेरीनंतरही भाजपाच आघाडीवर; भाजपाच्या गावितांना 1 लाख 13 हजार 183 मतं; श्रीनिवास वनगा यांना 95 हजार 772 मतं, बळीराम जाधव 78 हजार 185 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर.

- नवव्या फेरीनंतर राजेंद्र गावित 1 लाख 2 हजार 154 मतांसह आघाडीवर; चिंतामण वनगा यांना 84 हजार 311 मतं, तर बळीराम जाधव यांना 69,963 मतं

- आठव्या फेरीनंतर राजेंद्र गावित 91 हजार 795 मतांसह आघाडीवर; शिवसेनेचे श्रीनिवास वनगा 73 हजार 387 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर, बळीराम जाधव 62 हजार 187 मतांसह तिसऱ्या स्थानी

- सातव्या फेरीनंतरही राजेंद्र गावित यांची आघाडी कायम; राजेंद्र गावित- 80 हजार 97, श्रीनिवास वनगा- 62 हजार 680, बळीराम जाधव 54 हजार 903

- सहाव्या फेरीनंतर राजेंद्र गावित यांना 67 हजार 975 मतं; श्रीनिवास वनगा 52 हजार 893 मतं, तर बळीराम जाधव यांना 47 हजार 606 मतं

- पाचव्या फेरीनंतरही राजेंद्र गावित आघाडीवर

- चौथ्या फेरी अखेर भाजपाच्या राजेंद्र गावित यांना 79 हजार 376 मतं तर सेनेच्या श्रीनिवास वनगा यांना 60 हजार 913 मतं.

- चौथ्या फेरीनंतर बविआचे बळीराम जाधव 63 हजार 360 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर 

-चौथ्या फेरीनंतर भाजपा 16 हजार 069 मतांनी पुढे

- तिसऱ्या फेरीनंतर भाजपाला 6 हजार 857 मतांची आघाडी

- राजेंद्र गावित (भाजपा) 33464, बळीराम जाधव (बविआ) 26607, श्रीनिवास वनगा (शिवसेना) 26318

- दुसऱ्या फेरीनंतर भाजपा- 23271, बविआ- 18923, शिवसेना- 18505, काँग्रेस- 3422

- दुसऱ्या फेरीनंतर भाजपा साडेचार हजार मतांनी आघाडीवर

- पहिल्या फेरीत राजेंद्र गावित (भाजपा) 11,236, बळीराम जाधव (बविआ) 11090, श्रीनिवास वनगा (शिवसेना) 8190

- राजेंद्र गावित आघाडीवर; बविआचे बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर

- निवडणूक अधिकारी आणि पत्रकारांमध्ये वादावादी; पहिल्या फेरीनंतरही आकडेवारी जाहीर न केल्यानं हमरीतुमरी

- विक्रमगडमध्ये माकपा उमेदवार पुढे

- पोस्टल मतांमध्ये भाजपा आघाडीवर

- डहाणूमध्ये भाजपाचे राजेंद्र गावित पुढे

- मतमोजणीला सुरुवात

- थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार

- भाजपा, शिवसेनेमध्ये कडवी लढत

 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस