शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एकदरामधील स्वाईन फ्लू नियंत्रणात

By admin | Updated: May 4, 2015 01:06 IST

गेल्या काही दिवसांपासून मुरुड तालुक्यातील एकदरा गावात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यामध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या दोन रुग्णांना

बोर्ली-मांडला : गेल्या काही दिवसांपासून मुरुड तालुक्यातील एकदरा गावात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यामध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला तर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार झाल्याने चार रुग्ण पूर्ण बरे झाले आहे. मुरुड तालुका आरोग्य विभाग आणि आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अभियान राबवून एकदरा गावातील स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले असून कोणीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांनी केले आहे.एकदरा गावामध्ये मागील काही दिवसांपासून स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले. तत्पूर्वी गावामध्ये श्रीराम नवमी यात्रेनिमित्त गावातील ग्रामस्थ नोकरी व्यवसायानिमित्त परगावी राहत आहेत. ती मंडळी गावात आली होती यावेळी गावामध्ये स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण होता. गावातील एकाच कुटुंबातील चार जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. मात्र वेळीच त्याच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने व आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेवून स्वाइन फ्लूवर अभियान राबवून जनजागृती केल्यामुळे रोगावर नियंत्रण मिळाले. तरी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्दी, पडसे, दम लागणे, घसा दुखणे अगर ताप येण्यासारखी लक्षणे दिसू लागताच नजीकच्या ग्रामीण रुग्णालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार घेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. स्वाइन फ्लूचा आजार टाळण्यासाठी सर्दी खोकला येणाऱ्या रुग्णांपासून सहा फूट दूर रहावे. (वार्ताहर)