शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

बांबूचे बंध विणणाऱ्या आदिवासींची उपासमार, शेतकऱ्यांची कापडी पट्ट्यांना पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 01:43 IST

Palghar News : भारे बांधण्यासाठी शेतकरी स्वस्तात मिळत असलेल्या कापडी पट्ट्यांचा उपयोग करीत असल्याने बंधांची विक्री होत नसल्याने आदिवासींसाठी दोन महिने चालणाऱ्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

- सुनील घरत पारोळ : कोरोनाच्या महामारीने अनेक व्यवसाय व उद्योग डबघाईला आले असतानाच शेतकऱ्यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध (बांबूपासून तयार केलेला दोर) खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने आदिवासी भागातील बंध व्यावसायिक अडचणीत आले आहेत. भारे बांधण्यासाठी शेतकरी स्वस्तात मिळत असलेल्या कापडी पट्ट्यांचा उपयोग करीत असल्याने बंधांची विक्री होत नसल्याने आदिवासींसाठी दोन महिने चालणाऱ्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.भातपिकाची कापणी केल्यानंतर त्याचे भारे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना पाचशे ते दोन हजार नगापर्यंत बंधांची गरज भासते. आदिवासी बांधव जंगलातील लहान बांबूंपासून हे बंध बनवितात. वसई तालुक्यात घाटेघर, सायवन, काळभोन, लेंडी, तिल्हेर, करजोन या भागातून बंध तयार करून गावागावात किंवा आठवडे बाजारात विकतात. शेकडो महिला-पुरुष बंध विक्रीचा व्यवसाय दोन महिने भातकापणीच्या हंगामात करतात. त्यामुळे या व्यवसायातून चांगला रोजगारही मिळत असे. पण शेतकऱ्यांनी पट्टीला पसंती दिल्याने हा रोजगार आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. यंदा शेतीवर परतीच्या पावसाचे संकट आलेले आहेच, पण सर्वाधिक परिणाम हा सध्या भाताचे भारे बांधण्यासाठी कापडी पट्ट्यांचा मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या वापरामुळे बंध व्यवसायच धोक्यात आला आहे. 

बंध तयार करण्याची पद्धतदोन-तीन दिवसांपूर्वीच तोडलेल्या ओल्या बांबूचे ५-६ फूट लांबीच्या अंतरावर तुकडे केले जातात. हे तुकडे दगडावर ठेचून ३-४ दिवस सुकविले जातात आणि शंभर बंधांचा गठ्ठा करून प्रति शेकडा (१०० नग) दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत बाजारात विकायला आणले जातात. दिवाळी सणादरम्यान होणाऱ्या या व्यवसायातून शेकडो कुटुंबांची दिवाळी आनंदात जात होती, मात्र कोरोना व कापडी पट्ट्यांच्या आलेल्या संकटामुळे हा व्यवसाय बंद करण्याची वेळ या आदिवासी कुटुंबांवर आली आहे.

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरार