शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

वर्दीच्या फुकटेगिरीविरोधात हॉटेलवाले एकवटले

By admin | Updated: April 12, 2016 00:27 IST

फुकटचे खाऊन-पिऊन हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी करीत वसई तालुका हॉटेल असोसिएशनने पोलीसी अत्याचाराविरोधात आता

- शशी करपे,  वसईफुकटचे खाऊन-पिऊन हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी करीत वसई तालुका हॉटेल असोसिएशनने पोलीसी अत्याचाराविरोधात आता आवाज उठवला आहे. पोलीसी अत्याचारामुळे हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले असून हवालदाराला बडतर्फ केले नाही तर बेमुदत बंद पुकारला जाईल, असा इशारा दिला आहे.गेल्या आठवड्यात माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितीन नलावडे यांनी तृप्ती बारमध्ये दारू पिऊन बिल मागीतल्याने घिंगाणा घातला होता. तसेच हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याची तक्रार सीसीटीव्ही फुटेजसहीत केल्यानंतरही पोलिसांनी साधी एनसी नोंदवून नलावडेवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतापलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी पोलीसी अत्याचाराचा पाढा सीसीटीव्ही फुटेजसह पत्रकारांपुढे मांडला. पोलीस हॉटेल व्यावसायिकांवर करीत असलेल्या अत्याचाराची सचित्र माहिती चक्रावून सोडणारी आहे. काही महिन्यांपूर्वी तुळींज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बैनवाड यांनी मोरेगाव येथील क्यू अँड क्यू बारमध्ये धिंंगाणा घातल्याचे चित्रीकरण दाखवण्यात आले. विरारमध्ये मनवेल पाडा येथील मनाली बार आणि वसईतील ग्रीन हाऊस बारमध्ये पोलिसांनी धिंंगाणा घातल्याचे चित्रीकरण हॉटेल व्यावसायिकांनी दाखवून पोलिस अत्याचाराने सीमा ओलांडल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश हेगडे यांनी केला आहे. पोलिसांचा हा अत्याचार थांबवायचा असेल तर नलावडे सारख्या अत्याचारी पोलिसाला बडतर्फ करायलाच हवे, अशी मागणी हेगडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. नाकाबंदी, साहेबांचा दौरा, कार्यक्रंमासाठी हजारो रुपयांचे फुकटचे जेवण, बाराही महिने फुकटे बिसलरी पाणी ही फुकटेगिरी पोलिसांकडून सुरु आहे. आता बारमध्ये फुकटची दारू पिऊन धिंंगाणा घालू लागले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहेत, असे हेगडे यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारचे विविध पाच-सहा सेवा कर बार-परमीट रुमवाले हॉटेल व्यावसायिक •करीत आहेत, असे असताना पोलिसांचा अत्याचार सहन करावा लागत असून वर्दीच्या जाचाला कंटाळून वसईतील ७५ टक्के हॉटेलवाले व्यवसाय बदलायच्या मनस्थितीत आहेत, असेही हेगडे यांनी सांगितले.