वीजेच्या धक्क्याने नेहरोलीत मुलीचा मृत्यू

By Admin | Updated: July 9, 2015 23:24 IST2015-07-09T23:24:29+5:302015-07-09T23:24:29+5:30

विजेचा धक्का लागून चैताली मुकणेचा मृत्यू झाल्याची घटना वाडा तालुक्यातील नेहरोली येथे गुरूवारी (दि.९) दुपारच्या सुमारास घडली.

Girl's death in Nehruoli by electric shock | वीजेच्या धक्क्याने नेहरोलीत मुलीचा मृत्यू

वीजेच्या धक्क्याने नेहरोलीत मुलीचा मृत्यू

वाडा : विजेचा धक्का लागून चैताली मुकणेचा मृत्यू झाल्याची घटना वाडा तालुक्यातील नेहरोली येथे गुरूवारी (दि.९) दुपारच्या सुमारास घडली. ती आपल्या लहान भावंडांना घरी आणण्यासाठी शाळेत गेली होती. शाळेशेजारीच कुंपणानजीक असलेल्या विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. त्याला चैताली हिचा हात लागल्याने विजेचा जोरदार धक्का बसला. रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ खांबाला चिकटून राहिल्याने तिचा जागीच मृत्यू झला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असून चैतालीच्या कुटुुंबियांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Girl's death in Nehruoli by electric shock