अखेर तुळजापुरात सापडल्या नायगावच्या तिन्ही मुली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 02:41 AM2020-11-25T02:41:29+5:302020-11-25T02:41:55+5:30

स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सोडली होती घरे

Finally, the three girls from Naigaon were found in Tuljapur | अखेर तुळजापुरात सापडल्या नायगावच्या तिन्ही मुली

अखेर तुळजापुरात सापडल्या नायगावच्या तिन्ही मुली

googlenewsNext

नालासोपारा : नायगावच्या चिंचोटी परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा गुन्हा शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. अखेर त्या तिन्ही मुली वालीव पोलिसांच्या टीमला तुळजापुरात सापडल्या असून ३६ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

नायगावच्या चिंचोटी परिसरातील दळवीपाडा येथील भाबीपाडा चाळीत राहणारे मुन्नासिंग रामधनी चव्हाण (३९) यांची अल्पवयीन मुलगी कांचन (१२), तिच्या मैत्रिणी प्रियंका (१५) आणि कविता (१३) या घरातील कोणालाही काहीही न सांगता शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निघून गेल्या होत्या. या प्रकरणी वालीव पोलिसांनी पथक स्थापन करून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मुलींचा तपास करताना एक मोबाइल नंबर पोलिसांना सापडला. त्या माहितीवरून पोलिसांनी टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर मुलींना तुळजापूरला सोडल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. 
त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नवले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस हवालदार तोत्रे आणि कोकणी यांची टीम गेली होती. 
या मुलींचा फोटो घेऊन प्रत्येक ठिकाणी शोधाशोध सुरू केली. या तिन्ही मैत्रिणी एका हॉटेलमध्ये थांबल्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तिन्ही मुलींना ताब्यात घेण्यात  आले.

तिघींनीही घरातून लांबवले पैसे
n एका मुलीने घरातून २७ हजार, दुसऱ्या मुलीने १ लाख, तर तिसऱ्या मुलीने २० हजार अशी रोख रक्कम घेऊन लग्न न करता स्वत:च्या पायांवर उभे राहण्यासाठी घरातून जात असल्याची चिठ्ठी लिहून तिन्ही मैत्रिणी निघून गेल्या होत्या. सध्या तिन्ही मुलींना पोलिसांच्या टीमने ताब्यात घेतले असून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‌‘लोकमत’ला सांगितले.  
 

Web Title: Finally, the three girls from Naigaon were found in Tuljapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.