शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 9:22 AM

वसई-विरारमध्ये चर्चा : मी तेवढा मोठा नेता नसल्याचा ठाकुरांचा दावा

विरार : बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराच्या नावावरील विवा ग्रुपवर शुक्रवारी पहाटे सहा वाजल्यापासून ईडीने धाडसत्र टाकले आणि शहरातील वातावरण ढवळून निघाले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धाड टाकली गेली असल्याचीही चर्चा रंगू लागली. दरम्यान, यामुळे आपले नाव मोठे होणार आहे, मात्र आपण तेवढा मोठा नेता नसल्याचा दावा आ. हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.विरार परिसरात शुक्रवारी पहाटेच सुरू झालेल्या या धाडसत्रामुळे माॅर्निंग वाॅकला गेलेल्या नागरिकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर शहरात एकच कुजबुज सुरू झाली. ईडीच्या पथकाने एकंदर पाच ठिकाणी धाडी टाकल्याचे समजते. पीएमसी बँकेच्या आणि मनीलॉन्ड्रिंगच्या संबंधातून ईडीने या धाडी टाकल्याचेही बोलले जात आहे. बहुचर्चित पीएमसी घोटाळ्यात पाच ते सहा हजार कोटींचे मनीलॉन्ड्रिंग झाले होते. यातले काही पैसे विवाशी संबंधित संस्थेमध्ये गुंतवण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई सुरू झाली असल्याचे सूत्रांकडून कळते.दरम्यान, मला काहीही माहीत नसून ते आलेले आहेत, ते चौकशी करत आहेत. स्टेशनच्या जुन्या घरी आणि कार्यालयात तपास, चौकशी ईडी करत आहे. ते माझ्याकडे आलेले नसून आमच्या परिवाराच्या नावावर असलेल्या विवामध्ये आले आहेत. नाव कशातही येऊ द्या, धनादेशद्वारे व्यवहार झालेले असून, त्याचे स्पष्टीकरण आम्ही देऊ, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.माझ्यामागे ईडी लागायला तेवढा मी मोठा नेता नाही, पण आज आणि उद्या पेपर आणि टीव्हीला नाव आल्याने मी मोठा होणार आहे. ईडीमुळे मोठे बनण्याची नक्कीच संधी मिळते. जे काही आहे ते समोर येईल व चुकीचे केले असेल तर तेही समोर येईल.- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, आमदार, बहुजन विकास आघाडी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय