शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

माकप विरुद्ध शिवसेनेच्या आमदारांचा रंगला कबड्डी सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 05:19 IST

दोघांनीही अभिनिवेश बाजूला ठेवत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

- अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी: डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय  जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धत बुधवार, 4 डिसेंबर रोजी चंद्रनगर केंद्रशाळेच्या मैदानावर डहाणू विधानसभेचे माकपचे आमदार विनोद निकोले आणि पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्यात रंगलेला कबड्डीचा सामना जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

चौदाव्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित डहाणू विधानसभेचे माकपचे आमदार विनोद निकोले आणि पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा हे दोघे डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेकरिता सदिच्छा भेट द्यायला दुपारच्या सुमारास चंद्रनगर शाळेच्या पटांगणावर आले होते. या दोन्ही आदिवासी आमदारांनी शालेयवयात कबड्डीचे धडे घेतले आहेत. आज जेव्हा शालेय विद्यार्थ्यांचे संघ आमने-सामने आल्यावर त्यांना जुने दिवस आठवले.

दोघांनीही अभिनिवेश बाजूला ठेवत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आमदार निकोले यांनी बोर्डी गटातील मुलांच्या कबड्डी संघाचे तर आमदार श्रीनिवास वनगा यांनी गंजाड संघाचे नेतृत्व करीत मैदानावर हजेरी लावताच, उपस्थितां मध्ये एकच जल्लोष सुरू झाला. निकोले यांनी चढाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वनगा यांनी निकोले यांना चक्रव्यूहात अडकविण्याचा केलेला शर्थीचा प्रयत्न केवळ सहकारी खेळाडूंची साथ न लाभल्याने अयशस्वी राहिल्याने निकोले यांची चढाई यशस्वी ठरली.

दरम्यान दोन्ही आमदारांच्या खेळाडूवृत्तीचे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य मान्यवरांनी कौतुक केले. तर  या सामन्याचे व्हिडीओ सोशलमीडियावर फिरू लागल्यावर नेटकाऱ्यांचीही त्याला पसंती मिळाली.     

टॅग्स :Vasai Virarवसई विरार