शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वडिलांचा मृतदेह नेला दुचाकीवर, पालघरमधील दुर्दैवी घटना, लॉकडाउनमुळे ओढवली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:41 IST

CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन सुरू असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचाच फटका वावरे कुटुंबीयांना शुक्रवारी बसला.

कासा : सर्पदंश झालेल्या वडिलांना कासा उपजिल्हा रुग्णालयात आणताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाउनमुळे त्यांचा मृतदेह मुलांना मोटरसायकलवर न्यावा लागल्याची दुर्दैवी घटना डहाणू तालुक्यात घडली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाउन सुरू असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचाच फटका वावरे कुटुंबीयांना शुक्रवारी बसला. कासा भागातील चिंचारे येथील लडका देवजी वावरे (६०) यांना शुक्रवारी सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची मुले त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात नेत होती.त्यांची तब्येत गंभीर झाल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आणि आपल्या वडिलांचा मृतदेह मोटरसायकलवरून घरी नेण्याची वेळ या मुलांवर आली. लडका यांना २४ मार्च रोजी, मंगळवारी सकाळी सर्पदंश झाला होता. उपचारांसाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्याचे सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसºया दिवशी, २५ मार्चला बुधवारी डिस्चार्ज दिला.मात्र घरी असतानाच शुक्रवारी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. तेव्हाच त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांची तब्येत गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घरी जाण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटरसायकलवरूनच माघारी घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.रूग्णाचा हार्टअ‍ॅटॅकने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप धोडी यांनी व्यक्त केला.- या रुग्णावर उपचार करून त्यांना घरी सोडले होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे कदाचित हार्टअ‍ॅटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप धोडी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर