शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या महामारीमुळे कुंभार समाज सापडला आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 23:31 IST

शहापूर तालुक्यातील चित्र : हजारो माठ विक्रीअभावी घरातच पडून; कारागीर, व्यावसायिकांपुढे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

रवींद्र सोनावळे

शेणवा : कोरोनामुळे ग्रामीण भागातील अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणारे कारागीर आणि कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक व्यवसाय म्हणून तयार केलेले मातीचे माठ विक्रीअभावी घरातच पडून राहिल्याने या कुंभार समाजावर आर्थिक संकट ओढवले आहे.

शहापूर तालुक्यातील अस्नोली, अल्यानी, चेरवली, बोंद्रेपाडा, सावरपाडा, बिरवाडी, लाहे, शेई येथील कुंभार समाज गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणारा मातीचे माठ तयार करतात. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मातीचा माठ तयार करण्यासाठी माती, जळाऊ लाकडे, शेण, लीद, आदी सामग्री लागते. त्यासाठी खर्चही आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे वर्षभरातील चारच महिने चालणारा हा व्यवसाय असून, एक कारागीर रोज दहा ते पंधरा माठ तयार करतो व लहानमोठ्या आकारानुसार दर ठरवून माठांची विक्री दारात येणाऱ्या स्थानिक किरकोळ ग्राहक किंवा घाऊक व्यापाऱ्यांद्वारे करतात. उन्हाळ्यात माठाला कल्याण, ठाणे, डोंबिवली व इतर शहरांतून मागणी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे किरकोळ ग्राहक किंवा घाऊक व्यापारी फिरकत नसल्याने माठ विक्रीअभावी दारातच पडून आहे. पावसाळ्यात हे माठ ठेवायचे कुठे या समस्येने व्यावसायिक ग्रासले आहेत. माठांच्या विक्रीअभावी आर्थिक समस्या भेडसावणाऱ्या कुंभार समाजासमोर व्यापाऱ्यांकडून आगाऊ घेतलेली रक्कम फेडायची कशी, पावसाळ्यात खाणार काय, कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार कसा, असे प्रश्न उभे ठाकले आहेत.

माठांची विक्री झाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुंभार बांधवांना आर्थिक मदत म्हणून अनुदान मिळावे अशी सरकारकडे मागणी केली आहे.    - संदीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवा     कार्याध्यक्ष, कुंभार समाज

कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या समाज बांधवांना अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी करणार आहे.    - कृष्णा सोनावळे, माजी     जिल्हाध्यक्ष, कुंभार समाजविक्रीअभावी तयार माठ दारातच पडून असल्याने आर्थिक समस्येने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची गंभीर समस्या उद्भवली आहे.    - बबन सोमवते,    कारागीर, सावरपाडा

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार