शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांच्या उपचारांवर सीसीटीव्हींची नजर; वसई-विरार महापालिकेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:56 IST

कोविड रुग्णालयांतील तक्रारींना बसणार चाप

पारोळ : वसई-विरार शहर महापालिकेने खाजगी रुग्णालयांतही राखीव खाटा ठेवून तेथे शासकीय दराने कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, बऱ्याचशा समर्पित कोविड-१९ रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांना जेवणखाणे वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यात संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयांत उपचारांत पारदर्शकता असावी, यासाठी वसई-विरार महापालिकेने प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आदेश जारी केला आहे.

१९ जून २०२० ला सुप्रीम कोर्टाने स्यूमोटो याचिका क्र. ०७/२०२० रोजीच्या आदेशान्वये कोविड-१९ बाधित रुग्णांच्या खबरदारीसंदर्भात निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे तत्काळ पूर्तीसाठी संबंधित समर्पित खाजगी, शासकीय रुग्णालयांना आदेश दिलेत.

वसई, विरारमध्ये असलेल्या कोविड-१९ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना औषधे, अन्न, गरम पाणी वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना संबंधित रुग्णालयांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे छायाचित्रण तपासणी, पर्यवेक्षणतज्ज्ञ समिती वा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्र यांनी निर्देशित केलेल्या अन्य प्राधिकारी संस्थेस उपलब्ध होईल, याची खात्री करण्याचे आदेश दिले.मदत कक्षाचीही स्थापना करणारसर्व कोविड-१९ रुग्णालयांनी रुग्णांसाठी एका इच्छुक सहायकास रुग्णालयाच्या आवारात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी. जो रुग्णालयामार्फत निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये किंवा ठिकाणी उपस्थित राहील किंवा थांबू शकेल. तसेच सर्व कोविड-१९ समर्पित रुग्णालयांनी मदत कक्षाची स्थापना करावयाची आहे. जेथून प्रत्यक्षरीत्या तसेच फोनद्वारे रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात चौकशी करणे शक्य होईल, असे आदेश वसई-विरार शहर महापालिकेने दिले आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस