शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकाऱ्यावर भीषण हल्ला, सहकारी ठार; शिरगाव परिसरातील खदानीजवळ थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 21:31 IST

विरारमध्ये दहशत आणि रक्ताचा खेळ, महसूल अधिकाऱ्यावर पाशवी हल्ला, सहकाऱ्याचा दुर्दैवी अंत

मंगेश कराळे

Nalasopara Crime:विरारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले असून, विरारच्या शिरगाव परिसरात महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. वाळू माफिया किंवा जमीन प्रकरणातील वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असून, या भीषण घटनेत मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांचे सहकारी आत्माराम पाटील यांना आपला प्राण गमवावा लागला आहे, तर स्वतः प्रभाकर पाटील हे मृत्यूशी झुंज देत आहेत.

मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, शिरगाव परिसरातील एका खदानीजवळ ही थरारक घटना घडली. मंडल अधिकारी प्रभाकर पाटील आणि त्यांचे सहकारी आत्माराम पाटील हे सरकारी कामाच्या निमित्ताने या परिसरात गेले होते. मात्र, दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी अचानक त्यांच्यावर लाकडी दांडक्यांनी तुफान हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण आणि पाशवी होता की, हल्लेखोरांनी केवळ मानवी जीवच नव्हे तर त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करून आपला क्रूर हेतू स्पष्ट केला. या हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रभाकर पाटील हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने नियोजनबद्धरीत्या हा हल्ला केला, त्यावरून ही घटना पूर्वियोजित असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

महसूल विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्यावर दिवसाढवळ्या झालेला हा हल्ला म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेवर पुकारलेले खुले आव्हान मानले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण महसूल विभागात संतापाची लाट उसळली असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जमीन जुमला, खदान किंवा अवैध खननाशी संबंधित माफियांनी हा सूड उगवला आहे का, या दिशेने आता पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शिरगाव आणि विरार परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून दोषींना लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Revenue Officer Attacked, Colleague Killed Near Shirgaon Mine; Panic Grips Area

Web Summary : A revenue officer was brutally attacked near Shirgaon; a colleague died. The attack, suspected to be related to land disputes, has sparked outrage and raised concerns about the safety of government employees. Police investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVirarविरारPoliceपोलिस