शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:52 IST

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी  बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला...

मीरारोड :  मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील मीरा रोड येथील केम छो या ऑर्केस्ट्रा बारवरील धाडीत पोलिसांच्या छाप्याची वर्दी देण्यासाठी अलार्म आणि बारबालांना लपण्यासाठी गुप्त खोली व तेथून पळण्यासाठी वाट केल्याचे उघडकीस आले आहे. 

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी  बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला. मेकअप रूमच्या मागील पार्टिशनलगत गुप्त दरवाजा शोधून पोलिसांनी चावीने दार उघडले असता मागे अरुंद बोळ दिसून आली. त्या ठिकाणी ११ बारबाला लपलेल्या आढळल्या. तेथून मागच्या बाजूने पळून जाण्यासाठी वाट केलेली होती. मात्र, पोलिसांनी बाहेरून नाकाबंदी केल्याने त्यांना पळून जाता आले नाही.बारच्या प्रवेशद्वाराजवळ एक अलार्म बटन आढळून आले. पोलिस आले की बार कर्मचारी तो अलार्म बटन दाबायचा. त्यानंतर बारमधील दिवे सुरू होऊन आतील बारबालांना पळून जाण्याची सूचना दिली जात होती. या धाडीतही बाहेर पोलिस आल्याचे समजताच अलार्म बटन दाबून सूचित केले गेल्याने ११ बारबाला मागे लपून बसल्या होत्या. 

रात्री बारमध्ये महिला - पुरुष मिळून ८ सिंगर ठेवायची परवानगी असताना १८ बारबाला सापडल्या. केम छो बार हा पालिका व पोलिसांनी अनधिकृत म्हणून जमीनदोस्त केला होता. पालिकेने एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला होता. तरी न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे सांगून त्याचे बांधकाम पुन्हा करून बार सुरू केला.

गाण्याचा गंध नाही, तरीही ‘सिंगर’मीरारोड शहरात बहुतांश ऑर्केस्ट्रा बारची बांधकामे व अंतर्गत बदल हे बेकायदा आहेत. मात्र, महापालिकेसह पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही. बारबालांना बारचालक - मालक हे ‘सिंगर’ म्हणून दाखवतात. प्रत्यक्षात त्यांना गाणे गाण्याचा गंधदेखील नसतो. रेकॉर्ड वाजवून गाणी वाजवली जाण्याचे प्रकार चर्चेत आहेत. बहुतांश ठिकाणी तर ऑर्केस्ट्रा बार व लॉज जोडून आहेत, जेणेकरून अनैतिक व्यवसाय करणे सोपे होते. ऑर्केस्ट्रा बारच्या माध्यमातून दरमहा हप्त्यांचे सिंडिकेट चालत असल्याचे आरोप, तक्रारी झाल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdanceनृत्य