शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१०३ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, जिल्हाधिकारी गुरसळ यांनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 00:19 IST

जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी केले अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : कोरोनाच्या आजाराने अनेक धडधाकट तरुणांचा बळी घेतल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असतानाच पालघर नगरपालिका क्षेत्रातील वीरेंद्रनगर येथील १०३ वर्षीय आजोबांनी कोरोना आजारावर मात करण्यात यश मिळविले आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी स्वतः त्या आजोबांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

पालघर नगर परिषद क्षेत्रातील वेवूर (वीरेंद्रनगर) मधील श्यामराव इंगळे या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. आजोबांना ताप आला होता. तपासणीनंतर त्यांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. शंभरी गाठलेली असतानाही त्यांनी उपचारादरम्यान डॉक्टरांच्या औषधोपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे उपचारादरम्यान त्यांची ऑक्सिजनची पातळी राहिली. त्यांना कोविड केंद्रातून साेडण्याच्याआधी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आजोबांना पुष्प देऊन त्यांना निरोप दिला. त्यामुळे कोरोनाची बाधा झाली असली तरी योग्य काळजी,  उपचार व धीटपणा यामुळे काेराेना बरा हाेऊ शकताे, हे श्यामराव इंगळे यांनी दाखवून दिल्याचे डॉ. गुरसळ यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या