शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

वसईत १० चोरट्यांना अटक, मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 3:57 AM

विरार आणि नालासोपारा पोलिसांनी आपल्या हद्दीत चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मोटार सायकली चोरणाºया टोळीच्या मुसक्या आवळल्या असून १० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ मोटार सायकलींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वसई : विरार आणि नालासोपारा पोलिसांनी आपल्या हद्दीत चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मोटार सायकली चोरणाºया टोळीच्या मुसक्या आवळल्या असून १० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ मोटार सायकलींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मोटार सायकली चोरणाºया टोळीत विरारमधील इंजिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यासह अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस नाईक अनिल शिंदे, शशिकांत पाटील, जगदीश मराठे, विजय गुरव, शंकर शिंदे यांच्या पथकाने विना नंबरप्लेट घेऊन फिरणाºया तरुणाला ताब्यात घेतले. चौकशी त्याने आपल्या आणखी तीन साथीदारांसह विरार, गणेशपुरी आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १५ मोटार सायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चारही सराईत मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार किंमतीच्या १५ मोटार सायकली जप्त केल्या. यातील एक आरोपी विरारमधील इंजिनियरिंग कॉलेजचा विद्यार्थी असून चैनीसाठी आपल्या साथीदारांसह मोटार सायकली चोरत असल्याचे तपासात उजेडात आले आहे.दुसºया घटनेत विरार पोलिसांच्या टीमने बेकायदा पिस्तूल बाळगणाºया एका तरुणाला अटक केली आहे. तर विरार शहरात चेन स्नॅचिंग करणाºया एका सराईत चोराला अटक करून त्याच्याकडून ४१ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.नालासोपारा पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चैन स्नॅचिंग, मोटार सायकल चोर आणि घरफोड्यांच्या टोळ््या जेरबंद केल्या. नालासोपारा, नायगाव आणि माणिकपूर परिसरात चेन स्नॅचिंग, आणि मोटार सायकल चोरणाºया अफसर राही (२०, रा. आ़नंद नगर, माणिकपूर) यांच्यासह वसई पश्चिम येथे राहणाºया त्याच्या १७ वर्षाच्या साथीदाराला अटक केली आहे. तीन मोटार सायकलींसह ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दुसºया एका घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उस्मान गनी (१९, रा. नगीनदासपाडा, नालासोपारा) आणि साजीद शेख (१९, रा. बांद्रा) या दोन सराईत घरफोड्यांना अटक केली. त्यांनी तीन घरफोड्या केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ५१ हजारांचा ऐवज हस्तगत केला. तर बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असलेल्या फरारी अय्याझ नसीम खान या सराईत चेन स्नॅचरला अटक केली. अय्याझने नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या मोटार सायकलसह १ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा