शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर (राव) मार्गावरील अवैध टोल वसुलीला अभय कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

तुळजापूर-बुटीबोरी या मार्गावर देवळी तालुक्यातील कोल्हापूर (राव) या गावाला जाणारा चौरस्ता आहे. कोल्हापूर (राव) मार्गने बºयाच वर्षांपासून नागरिक रोहणी (वसू), विजयगोपाल, इंझाळा, नाचणगाव, पुलगाव मार्गे अमरावती, आर्वी जातात. या मार्गाने कधीही नागरिकांना अडचण गेली नाही. परंतु, राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण झाल्यावर हुस्रापूरजवळ टोलनाका सुरू झाला.

ठळक मुद्देनाकाबंदी करून उकळले जातात पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : बुटीबोरी ते तुळजापूर महामार्गावर सध्या हुस्रापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून टोलवसुलीचे काम सुरू आहे. मात्र, याच वसुली करणाऱ्या कंपनीच्यावतीने कोल्हापूर (राव) मार्गावरही नाकाबंदी करून अवैध पद्धतीने टोलवसुली सुरू आहे. या वसुलीला अभय कुणाचे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.तुळजापूर-बुटीबोरी या मार्गावर देवळी तालुक्यातील कोल्हापूर (राव) या गावाला जाणारा चौरस्ता आहे. कोल्हापूर (राव) मार्गने बºयाच वर्षांपासून नागरिक रोहणी (वसू), विजयगोपाल, इंझाळा, नाचणगाव, पुलगाव मार्गे अमरावती, आर्वी जातात. या मार्गाने कधीही नागरिकांना अडचण गेली नाही. परंतु, राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण झाल्यावर हुस्रापूरजवळ टोलनाका सुरू झाला. असे असले तरी नोट नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून अवैध पद्धतीने नाकाबंदी करून टोल वसूली केली जात आहे. त्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची नियुक्तीही करण्यात आली आहे. ते बळजबरी वाहने थांबवून कोल्हापूर राव चौरस्ता परिसरात ये-जा करणाºयांकडून टोलच्या नावावर पैसे उकळत आहेत. ही पूर्णत: बेकायदेशीर व पठाणी पद्धतीचा अवलंब करून वसुली आहे. त्यामुळे अनेकदा वादही होत आहेत. कंपनीने ही पठाणी वसूली बंद करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. या मार्गावर तुम्ही टोलवसुली कशी करू शकता असा सवाल या नागरिकांकडून केल्यावर अंगावर चाल केली जाते. शिवाय अश्लील शब्दाचा वापर करीत शिवीगाळही केली जात असल्याचे नागरिक सांगतात. एकूणच टोलच्या नावाखाली गुुंडप्रवृत्तीच्या या व्यक्तींकडून ये-जा करणाºयांना वेठीस धरले जात आहे. या संदर्भात विजयगोपालच्या सरपंच निलम बिन्नोड यांनी शासनाकडेही तक्रार केली आहे. ही बेकायदेशीर वसुली तातडीने बंद करण्याची मागणी त्यांनी या तक्रारीतून केली आहे. मागणीवर विचार न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. 

टॅग्स :tollplazaटोलनाका